लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावाचे आहेत. पण क्रिकेटच्या २२ यार्डांमधून दोन्ही देशांतील शांतीचा मार्ग जातो, असे म्हणतात. भाराताचा कर्णधार विराट कोहलीचे जगभरात फॅन्स आहेत. पण पाकिस्तानही त्याला अपवाद नाही. पाकिस्तानमध्ये तर एका चाहत्याने विराटचे नाव आपल्या देशाच्या जर्सीवर कोरल्याचे पाहायला मिळाले आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत असल्याचेही पाहायला मिळत आहे.
भारतासाठी बॅड न्यूज; न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यावर पावसाचे सावट शिखर धवनच्या रुपात भारताला एक धक्का बसलेलाच आहे. त्यानंतर आता दुसरा धक्काही बसण्याची शक्यता आहे. कारण भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यावर पावसाचे सावट असल्याचे म्हटले जात आहे. जर पावसामुळे सामना होऊ शकला नाही, तर दोन्ही संघांना एक गुण देण्यात येइल.
भारताने आतापर्यंत विश्वचषकात दोन सामने खेळले आहेत. पहिल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला सहज पराभूत केले होते. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने साडे तिनशे धावांचा पल्ला गाठला होता. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. पण आता तिसऱ्या सामन्यात त्यांची गाठ पडणार आहे ती न्यूझीलंडबरोबर. न्यूझीलंडने आतापर्यंत झालेल्या तिन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवत अव्वल स्थान पटकावले आहे.
या सामन्यासाठी भारताला फेव्हरेट समजले जात आहे. भारत न्यूझीलंडवर मात करेल, असे बऱ्याच जणांना वाटत आहे. त्यामुळे हा सामना जर पावसामुळे रद्द झाला तर भारतासाठी ते फलदायी नसेल.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना गुरुवारी ट्रेंट ब्रिज येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पाऊस थांबला तरी थंड वारे सुटलेले असतील. ही परिस्थिती न्यूझीलंडसाठी पोषक असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे भारतासाठी ही धोक्याची घंटा असल्याचे म्हटले जात आहे.
भारताला नमवण्यासाठी न्यूझीलंडच्या माजी कर्णधाराचा खास प्लॅनभारताचा तिसरा सामना न्यूझीलंडबरोबर गुरुवारी होणार आहे. या सामन्याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना असेल. कारण हे दोन्ही संघ चांगलेच तुल्यबळ आहेत. त्याचबरोबर दोन्ही संघांना आतापर्यंत विश्वचषकात पराभव स्वीकारावा लागालेला नाही. पण भारताला नमवण्यासाठी न्यूझीलंडच्या माजी कर्णधाराने खास प्लॅन आखल्याचे म्हटले जात आहे.
न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनियल व्हेटोरीने आता भारताविरुद्ध खास प्लॅन आखला आहे. व्हेटोरी हा आयपीएलमध्ये खेळला होता. त्याचबरोबर आता तो प्रशिक्षणही देत आहे. मुख्य गोष्ट म्हणजे आयपीएलमधील विराट कोहीलच्या आरसीबीमधूनच व्हेटोरी खेळला होता. त्यामुळे कोहलीचे कच्चेदुवे व्हेटोरीला चांगलेच माहिती असल्याचे बोलले जात आहे.
व्हेटोरीने न्यूझीलंडच्या संघाला सांगितले की, " भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघांमध्ये गुणवान खेळाडू आहेत. त्यामुळे हा सामना चांगलाच अटीतटीचा होऊ शकतो. जर न्यूझीलंडच्या संघाने दडपण योग्यपद्धतीने हाताळले तर त्यांना भारतावर विजय मिळवता येऊ शकतो. "