मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप संघासाठी भारतीय संघाची घोषणा सोमवारी होणे अपेक्षित आहे. भारताचा वर्ल्ड कप संघ जवळपास निश्चित असता तरी चौथ्या स्थानासाठीचा गुंता कायम आहे. दिनेश कार्तिक, रिषभ पंत आणि विजय शंकर यांचे नाव चर्चेत आहे. भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागनेही वर्ल्ड कपसाठीचा त्याचा भारतीय संघ जाहीर केला. त्याच्या या संघातील 8 खेळाडू हे प्रथमच वर्ल्ड कपमध्ये खेळणार आहेत, तर 7 खेळाडू हे 2015 च्या वर्ल्ड कप संघातील सदस्य आहेत. विशेष म्हणजे सेहवागने चौथ्या स्थानासाठी निवडलेला खेळाडू पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसणार आहे.
आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला जेतेपदाचा प्रमुख दावेदार मानला जात आहे. भारतीय संघाने मागील वर्षभरात देशात-परदेशात वन डे क्रिकेटमध्ये अविश्वसनीय कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सारख्या प्रतिस्पर्धींना विराटसेनेनं त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत करण्याचा पराक्रम गाजवला. त्यामुळे वर्ल्ड कप स्पर्धेतही भारतीय संघाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. संघातील एखादी जागा सोडल्यास वर्ल्ड कपसाठीचे शिलेदार जवळपास निश्चितच आहेत आणि त्याची औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. भारतीय संघात तीन स्थानांसाठी चुरस आहे. त्यात प्रामुख्याने चौथा क्रमांक, चौथा जलदगती गोलंदाज किंवा तिसरा फिरकीपटू आणि दुसरा यष्टिरक्षक या जागा चर्चेचा विषय आहेत. सेहवागने जाहीर केलेल्या संघात विजय शंकरची निवड ही सर्वांना आश्चर्यात टाकणारी आहे.
सेहवागने जाहीर केलेला संघ :विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, केदार जाधव, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, विजय शंकर, जसप्रीत बुमराह, रिषभ पंत.
या' खेळाडूला वर्ल्ड कप संघात न घेतल्यास ती भारताची मोठी चूक ठरेल, जॅक कॅलिस
दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि कोलकाता नाइट रायडर्सचा मुख्य प्रशिक्षक जॅक कॅलिसने आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघासाठी एका खेळाडूचे नाव सुचवले आहे. वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात दिनेश कार्तिकचे नाव नसल्यास आश्चर्य वाटेल, असे कॅलिसने म्हटले आहे. शिवाय कार्तिकला संघात न घेणे ही भारताची मोठी चूक ठरेल, असेही तो म्हणाला. वर्ल्ड कपसाठी निवडण्याते येणाऱ्या 15 सदस्यीय चमूत कार्तिकला संधी मिळेल, असा विश्वास कोलकाताच्या प्रशिक्षकाने व्यक्त केला आहे आणि कार्तिक हा संघातील चौथ्या क्रमांकाची गुंतागुंत सोडवेल, असेही त्याला वाटते.
Web Title: ICC World Cup 2019: Virender Sehwag's team India for the 2019 World Cup, 8 player play world cup for first time
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.