साऊदॅम्प्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात एक गोष्ट अशी घडली की, यापूर्वी विश्वचषकात ती कधीही घडली नव्हती. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. यावेळी न्यूझीलंडला पहिल्याच चेंडूवर धक्का बसला. पण हा सलामीवीर पहिल्याच चेंडूवर दोनदा आऊट झाल्याचे पाहायला मिळाले, नेमके घडले तरी काय ते जाणून घ्या...
वेस्ट इंडीजकडून पहिले षटक शेल्डन कॉट्रेल टाकले. आपल्या पहिल्याच चेंडूवर कॉट्रेलने न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिलला बाद केले. ऑन साइडला फटका मारण्याच्या नादात गप्तिलच्या पॅडवर हा चेंडू आदळला. कॉट्रेलने यावेळी पंचांकडे जोरदार अपील केले. पंचांनीही हे अपील मान्य केले नाही आणि त्यांनी गप्तिलला आऊट दिले नाही. त्यानंतर कॉट्रेल आणि वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर यांच्यामध्ये चर्चा झाली आणि त्यांनी रीव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला.
तिसऱ्या पंचांनी हा चेंडू पुन्हा पाहिला. हा चेंडू स्टम्पच्या लाईनमध्येच पडला होता. त्याचबरोबर हा चेंडू स्टम्पलाही लागत होता. त्यामुळे पंचांनी गप्तिलला बाद दिले. त्यामुळे न्यूझीलंडला पहिल्याच चेंडूवर धक्का बसला. पण त्यानंतर गप्तिल पहिल्याच चेंडूवर दुसऱ्यांदा आऊट झाल्याचे पाहायला मिळाले. ही गोष्ट विश्वचषकात पहिल्यांदा पाहायला मिळाली.
न्यूझीलंडचा यापूर्वी सामना अफगाणिस्तानबरोबर झाला होता. या सामन्यातही गप्तिल पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. विश्वचषकात एक सलामीवीर सलग दोन्ही सामन्यात शून्यावर बाद होण्याची ही पहिलीच वेळ होती.