लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारत आणि इंग्लंड यांच्यातील लढतीला गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी उपस्थिती लावली होती. महान फलंदाज सचिन तेंडुलकरसोबत स्टेडियममध्ये बसून त्यांनी हा सामना पाहिला होता. तेंडुलकरने पिचाईंसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्टकरताना त्याखाली गमतीशीर कमेंट लिहिली होती आणि त्यावर पिचाई यांनीही मजेशीर उत्तर दिले. यावेळी पिचाई यांनी कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीचा एक डायलॉग उचलला आणि तेंडुलकरला उत्तर दिले.
बर्मिंगहॅम येथे रविवारी झालेल्या लढतीत यजमान इंग्लंडनेभारतीय संघावर विजय मिळवला. इंग्लंडच्या 337 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला 306 धावांपर्यंतच मजल मारता आली. रोहित शर्मा ( 102), विराट कोहली ( 66), हार्दिक पांड्या ( 45) आणि महेंद्रसिंग धोनी ( 42*) यांची खेळी व्यर्थ ठरली. इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टो ( 111), बेन स्टोक्स ( 79), जेसन रॉय ( 66) आणि जो रूट ( 44) यांनी दमदार खेळ केला. या सामन्याला पिचाई यांनी हजेरी लावली होती. तेंडुलकरने त्यांच्यासोबतचा फोटो ट्विट केला आणि त्याखाली, 'क्या ये सुंदर पिक है? ( Kya yeh Sundar pic-hai?) असे लिहिले.
पाकिस्तानसह इंग्लंडच्या विजयाने भारतीय संघालाही धक्का; जाणून घ्या कसालंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : यजमान इंग्लंडनं बुधवारी न्यूझीलंडवर मिळवलेला विजय हा पाकिस्तान संघासाठी मोठा धक्काच होता. इंग्लंडने या विजयासह उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आणि न्यूझीलंड सरस नेट रनरेटच्या जोरावर चौथ्या स्थानासह अंतिम चौघांत प्रवेश करेल, हेही निश्चित आहे. त्यामुळे पाकिस्तानला अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवूनही उपयोग होणार नाही. त्यांचे स्पर्धेतील आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आल्यात जमा आहे. इंग्लंडचा हा विजय पाकिस्तानसह विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघासाठीही धक्का देणारा ठरला आहे... जाणून घ्या कसे...
वर्ल्ड कप स्पर्धेतील सलग तीन पराभवामुळे इंग्लंड संघाचे उपांत्य फेरीतील स्थान धोक्यात आले होते.शिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वन डे क्रमवारीतील अव्वल स्थानही त्यांना गमवावे लागले होते. इंग्लंडची दुसऱ्या स्थानी घसरण झाली होती आणि 123 गुणांसह भारतीय संघ अव्वल स्थानावर विराजमान झाला होता. मे 2018 पासून इंग्लंड अव्वल स्थानावर होता. पण, आता न्यूझीलंडविरुद्धच्या विजयाने इंग्लंडला पुन्हा अव्वल स्थान मिळवून दिला आहे. इंग्लंड 123 गुणांसह अव्वल स्थान काबीज केले आहे, तर भारताला एक गुणाचा तोटा सहन करावा लागला आहे.