लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : वरील शिर्षक वाचून भारतीय संघ इंग्लंडमध्ये विश्वचषक खेळायला गेलाय की जंगलात शिकार करायला, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण ही गोष्ट आम्हीच सांगत नाही, तर दस्तुरखुद्द बीसीसीआयनेच या गोष्टीचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये भारतीय खेळाडू जे काही करत आहेत, ते सुरुवातीला आपल्याला समजत नाही. पण जसजसा हा व्हिडीओ पुढे पुढे जातो, त्यानंतर आपल्याला भारतीय संघ नेमका काय करतोय, हे उलगडायला लागते.
या व्हिडीओमध्ये भारतीय खेळाडू एका जंगलात जाताना पाहायला मिळाले. भारतीय खेळाडूंनी आर्मीसारखा गणवेश परीधान केला आणि त्यानंतप बंदुकी घेऊन ते जंगलात निघाल्याचे पाहायला मिळाले. काही खेळाडू तर झाडाचा आडोसा घेत बंदुकीमधून गोळी चालवत असल्याचेही दिसले. भारतीय संघ नेमके काय करत आहे, हे मात्र यावेळी कळत नाही. पण भारताच्या काही खेळाडूंनी हे नेमकं काय होतं, याबाबत खुलासाही केला आहे.
हा पाहा तो खास व्हिडीओ
टीम इंडियाची लंडन सफारी, पाहा खास फोटो
विश्वचषकाला सुरुवात झाली आहे, पण भारताच्या सामन्यांना नाही. भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेबरोबर ५ जूनला होणार आहे. पण त्यापूर्वी भारतीय संघ लंडन सफारी करत असल्याचे पाहायला मिळाले.
भारतीय संघातील खेळाडू यावेळी जंगलासारख्या परिसरामध्ये दिसत आहेत. यावेळी खेळाडूंच्या मागे लाकडांनी बांधलेली घरं दिसत आहेत. त्याचबरोबर एकदम शांत वातावरण असल्याचेही पाहायला मिळत आहे. बीसीसीआयने यावेळी संघातील खेळाडूंचे तीन फोटो आपल्या ट्विटरवर पोस्ट केले आहेत. यामधील पहिल्या फोटोमध्ये माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये लोकेश राहुल आणि भारताचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर दिसत आहे. तिसऱ्या फोटोमध्ये रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि केदार जाधव दिसत आहेत.
Web Title: ICC World Cup 2019: When Indian players enter the forest with guns ...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.