ICC World Cup 2019 : 'विराट'सेनेत 15 सदस्य, पण वर्ल्ड कपमध्ये खेळताहेत 16 भारतीय; जाणून घ्या कसं?

ICC World Cup 2019 : क्रिकेटच्या महासंग्रामाला सुरुवात होऊन दोन दिवस झाले. इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान हे दोनही सामने एकतर्फी झाल्याने चाहत्यांची हिरमोड झाली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 09:24 AM2019-06-01T09:24:59+5:302019-06-01T09:25:56+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019 : Which country has the heaviest representation in World Cup 2019? Not India | ICC World Cup 2019 : 'विराट'सेनेत 15 सदस्य, पण वर्ल्ड कपमध्ये खेळताहेत 16 भारतीय; जाणून घ्या कसं?

ICC World Cup 2019 : 'विराट'सेनेत 15 सदस्य, पण वर्ल्ड कपमध्ये खेळताहेत 16 भारतीय; जाणून घ्या कसं?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : क्रिकेटच्या महासंग्रामाला सुरुवात होऊन दोन दिवस झाले. इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान हे दोनही सामने एकतर्फी झाल्याने चाहत्यांची हिरमोड झाली. पण, 1992नंतर प्रथमच साखळी पद्धतीनं खेळवण्यात येणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत थरारक सामन्यांची मेजवानी नक्की पाहायला मिळेल, अशी आशा आहे. क्रिकेटचा हा मानाचा चषक उंचावण्यासाठी जगातील 10 अव्वल संघ एकमेकांशी भिडणार आहेत. प्रत्येक संघाने 15 सदस्यीय चमू या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी जाहीर केला आहे. त्यानुसार एकूण 150 खेळाडू या स्पर्धेत जेतेपदाचा चषक उंचावण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहेत. पण, या स्पर्धेत 16 भारतीय खेळाडू जेतेपदासाठी प्रयन्तशील आहेत. कसे चला जाणून घेऊया...

या स्पर्धेत सहभागी झालेल्या 150 खेळाडूंच्या जन्मस्थळाचा विचार केल्यास यजमान इंग्लंडच्या संघात 5 खेळाडू हे देशाबाहेरील आहेत. तसेच, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या संघातील बरेच खेळाडू हे परदेशी आहेत. भारत, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि श्रीलंका या संघांतील एकही खेळाडू परदेशी नाही. राष्ट्रीयत्वाचा विचार केल्यास दक्षिण आफ्रिकेचे सर्वाधिक 17, तर भारत आणि पाकिस्तान यांचे प्रत्येकी 16 खेळाडू यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये खेळत आहेत. 

इंग्लंड संघातील जेसन रॉय आणि टॉम कुरण या दोन खेळाडूंचा जन्म हा दक्षिण आफ्रिकेमधील, तर न्यूझीलंडचा कॉलीन मुन्रो हाही आफ्रिकेचा. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात इंग्लंडच्या विजयाचा नायक बेन स्टोक्सचा जन्म हा ख्राईस्टचर्च येथील. इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन हा आयर्लंडचा आणि त्याने आयर्लंडकडून 23 वन डे सामनेही खेळले आहेत.

न्यूझीलंडचा फिरकीपटू इश सोढीचा जन्म भारतातील, तर पाकिस्तानचा अष्टपैलू इमाद वासमी हा वेल्समध्ये जन्मला आहे. ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा आणि दक्षिण आफ्रिकेचा इम्रान ताहीर हे मुळचे पाकिस्तानचे. झिम्बाब्वेचा संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरला नसला तरी या देशात जन्मलेला कॉलीन डी ग्रँडहोम हा न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करत आहे.



कोणत्या देशाचे किती खेळाडू 
17 दक्षिण आफ्रिका - जेसन रॉय, टॉम कुरण, कॉलीन मुन्रो
16 भारत - इश सोढी 
16 पाकिस्तान - उस्मान ख्वाजा, इम्रान ताहीर
15 अफगाणिस्तान
15 बांगलादेश
15 श्रीलंका
14 ऑस्ट्रेलिया
13 न्यूझीलंड - बेन स्टोक्स
10 इंग्लंड 
6 बार्बाडोस - जोफ्रा आर्चर
5 जमैका - ख्रिस गेल
4 त्रिनिदाद अँड टोबॅगो - निकोलस पूरण
1 गयाना -  शिमरोन हेटमायर
1 आयर्लंड - इयॉन मॉर्गन
1 वेल्स - इमाद वासीम 
1 झिम्बाब्वे - कॉलीन डी ग्रँडहोम

Web Title: ICC World Cup 2019 : Which country has the heaviest representation in World Cup 2019? Not India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.