लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये उद्या उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने आज कसून सराव केला. या सरावा दरम्यान भारतीय खेळाडूंनी विविध व्यायामप्रकार केले. व्यायाम करत हा भारताचा खेळाडू अशा काही पोझमध्ये होता की, त्याला ओळखणे सोपे जात नव्हते. तुम्हाला तरी हा खेळाडू ओळखता येतोय का...
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मंगळवारी होणारा उपांत्य फेरीचा सामन्यावर पावसाचे सावट आहे. British MET departmentच्या माहितीनुसार सामन्यादरम्यान ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी पावसाची शक्यता 50 टक्के आहे आणि त्यामुळे सामना थोडा उशीरा सुरू होऊ शकतो. योगायोग म्हणजे साखळी फेरीत उभय संघांमधील सामना पावसामुळे रद्द झाला होता. हा सामना जर रद्द झाला तर भारतीय संघाला अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळू शकते. पण आतापर्यंतच्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडपेक्षा भारताचेच पारडे जड असल्याचे पाहायला मिळाले आहे.
आतापर्यंत भारतीय संघ सहा वेळा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. या सहापैकी तिनदा भारताचा संघ विजयी ठरला आहे, तर तीन सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. न्यूझीलंडचा संघ आतापर्यंत सातवेळा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. या सातपैकी फक्त एका उपांत्य फेरीत त्यांना विजय मिळवता आला आहे. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत सर्वाधिक यशस्वी ठरला आहे तो ऑस्ट्रेलियाचा संघ. ऑस्ट्रेलिया आतापर्यंत सातवेळा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. या सात सामन्यांपैकी तब्बल सहा उपांत्य फेरींमध्ये त्यांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली आहे.
इंग्लंडमधील विश्वचषक आता अखेरच्या टप्प्यामध्ये आला आहे. आता तीन सामन्यांनंतर आपल्याला विश्वविजेता कोण हे समजू शकणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना मंगळवारी रंगणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचू शकतो. पण यावेळी विश्वविजेत्या संघावर पैशांचा पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर अन्य संघही मालामाल होणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मंगळवारी होणारा उपांत्य फेरीचा सामन्यावर पावसाचे सावट आहे. British MET departmentच्या माहितीनुसार सामन्यादरम्यान ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी पावसाची शक्यता 50 टक्के आहे आणि त्यामुळे सामना थोडा उशीरा सुरू होऊ शकतो. योगायोग म्हणजे साखळी फेरीत उभय संघांमधील सामना पावसामुळे रद्द झाला होता. हा सामना जर रद्द झाला तर भारतीय संघाला अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळू शकते.
जो संघ विश्वचषक जिंकेल त्यांना 28 कोटी रुपये मिळतील. उपविजेत्या संघाला 14 कोटी रुपयांचे बक्षिस मिळणार आहे. उपांत्य फेरीत जे संघ पराभूत होतील, त्यांना प्रत्येकी 5.5 कोटी रुपये मिळणार आहेत.