Join us  

ICC World Cup 2019 : हे फलंदाज ठरतील का विश्वचषकातील सिक्सर किंग?

पाहूया असे कोणते ते चार फलंदाज आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2019 8:31 PM

Open in App

सचिन कोरडे, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : विश्वचषक स्पर्धेला धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. प्रत्येक संघांचे खेळाडू सज्ज आहेत. कोणत्या संघाचे फलंदाज, गोलंदाज प्रतिस्पर्ध्यांसाठी कर्दनकाळ ठरतील, अशी चर्चा विविध शोमध्ये सध्या सुरू आहे. असे असताना या विश्वचषकामध्ये सर्वाधिक षटकार कुणाच्या नावावर असतील, याचेही भाकीत केले जात आहे. काही फलंदाजांमध्ये अशी क्षमता आहे जे षटकारांच्या यादीत टॉपवर असतील. आतापर्यंत या खेळाडूंनी क्रिकेटचे मैदान चांगलेच गाजवले आहे, आता विश्वचषकात त्यांच्याकडून षटकारांची बरसात पाहायला मिळते का, याची उत्सुकता सर्वांना असेल.

पाहूया असे कोणते ते चार फलंदाज आहेत. १) ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) : युनिव्हर्स बॉस म्हणून ओळख. याची कारकीर्द षटकार किंग म्हणून अधिक लोकप्रिय ठरली. ३९ वर्षीय या फलंदाजाने गेल्या वर्षभरात इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर ३९ षटकार ठोकले आहेत.पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक षटकार ठोकत त्याने विश्वचषकात विक्रम नोंदविला आहे. आता त्याच्या नावावर ४० षटकार आहेत. डिव्हिलियर्सपेक्षा ४ अधिक षटकार ठोकत तो टॉपवर आहे.

२) रोहित शर्मा : भारतीय क्रिकेटमधील हा हिटमॅन. भारतीय संघासाठी विजयी खेळी करण्याची क्षमता. मैदानावर थांबल्यास प्रतिस्पर्ध्यांचा कर्दनकाळ ठरू शकतो.२०१५ पासून रोहितने वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकले आहेत.

३) इयॉन मॉर्गन (इंग्लंड) : हा फलंदाज इंग्लंडसाठी सर्वांत महत्त्वपूर्ण आहे.चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा मॉर्गन हा परिस्थितीनुसार खेळ करण्यात माहीर आहे. या आयरिशमॅनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक झळकाविलेले आहे. अवघ्या २१ चेंडूंत अर्धशतक झळकावीत त्याने त्याची क्षमता दाखवून दिली. या विश्वचषकात सर्वाधिक षटकारांच्या यादीत हा फलंदाजही असेल.

 ४)मार्टिन गप्टील (न्यूझीलंड) : किवीच्या या सलामीवीराकडे प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवर दबाव वाढविण्याची क्षमता आहे. कोलीन मुन्रोसोबत त्याची जोडी भक्कम आहे. मोठी खेळी करण्याची ताकद, फटक्यांचे विविध पर्याय, जबरदस्त आत्मविश्वास या फलंदाजाकडे आहे. २०१५ विश्वचषकामध्ये या ३५ वर्षीय खेळाडूने सर्वाधिक धावा केल्या होत्या.

टॅग्स :रोहित शर्माख्रिस गेलवर्ल्ड कप 2019