ICC World Cup 2019 : विश्वविजेत्यावर होईल पैशांचा पाऊस, कोणता संघ किती मालामाल होईल, जाणून घ्या...

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मंगळवारी होणारा उपांत्य फेरीचा सामन्यावर पावसाचे सावट आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2019 04:57 PM2019-07-08T16:57:41+5:302019-07-08T16:58:37+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019: world cup winner get how many prize money ... | ICC World Cup 2019 : विश्वविजेत्यावर होईल पैशांचा पाऊस, कोणता संघ किती मालामाल होईल, जाणून घ्या...

ICC World Cup 2019 : विश्वविजेत्यावर होईल पैशांचा पाऊस, कोणता संघ किती मालामाल होईल, जाणून घ्या...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंडमधील विश्वचषक आता अखेरच्या टप्प्यामध्ये आला आहे. आता तीन सामन्यांनंतर आपल्याला विश्वविजेता कोण हे समजू शकणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना मंगळवारी रंगणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचू शकतो. पण यावेळी विश्वविजेत्या संघावर पैशांचा पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर अन्य संघही मालामाल होणार आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मंगळवारी होणारा उपांत्य फेरीचा सामन्यावर पावसाचे सावट आहे. British MET departmentच्या माहितीनुसार सामन्यादरम्यान ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी पावसाची शक्यता 50 टक्के आहे आणि त्यामुळे सामना थोडा उशीरा सुरू होऊ शकतो. योगायोग म्हणजे साखळी फेरीत उभय संघांमधील सामना पावसामुळे रद्द झाला होता. हा सामना जर रद्द झाला तर भारतीय संघाला अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळू शकते.

जो संघ विश्वचषक जिंकेल त्यांना 28 कोटी रुपये मिळतील. उपविजेत्या संघाला 14 कोटी रुपयांचे बक्षिस मिळणार आहे. उपांत्य फेरीत जे संघ पराभूत होतील, त्यांना प्रत्येकी 5.5 कोटी रुपये मिळणार आहेत.

भारतीय संघाने मँचेस्टर वर यावर्षी खेळले दोन सामने 
भारतीय संघाने यावर्षी मँचेस्टर येथे खेळलेल्या दोन्ही सामन्यांत विजय मिळवले आहेत. येथे भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर डकवर्थ लुईस नियमानुसार 89 धावांनी विजय मिळवला होता, दुसऱ्या लढतीत वेस्ट इंडिजवर 125 धावांनी मोठा विजय मिळवला होता.

ओल्ड ट्रॅफर्डवर भारतीय संघाची कामगिरी
भारतीय संघाने या मैदानावर आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत आणि त्यापैकी पाचमध्ये विजय मिळवला आहे. उर्वरित पाच सामन्यांत भारताला पराभव पत्करावा लागला होता. 1999च्या वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानवर 47 धावांनी विजय मिळवला होता, तेच 1983च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या साखळी फेरीत वेस्ट इंडिजला नमवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.
 
ओल्ड ट्रॅफर्डवर न्यूझीलंच संघाची कामगिरी
किवींचा या मैदानावरील विक्रम निराशाजनक आहे. येथे खेळलेल्या सातपैकी दोनच सामन्यांत त्यांना विजय मिळवता आलेला आहे. त्यांना चार सामन्यांत पराभव पत्करावा लागला, तर एक सामना रद्द झाला. यंदाच्या वर्ल्ड कपमध्येही त्यांनी येथे एकच सामना खेळला आणि त्यात त्यांनी वेस्ट इंडिजवर 5 धावांनी विजय मिळवला होता.
 
मँचेस्टर वर भारत विरुद्ध न्यूझीलंड विक्रम
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड येथे एकच सामना खेळला आहे. 1975च्या वर्ल्ड कप स्पर्धेत झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 60 षटकांत 230 धावा केल्या होत्या आणि न्यूझीलंडने 58.5 षटकांत 6 विकेट्सच्या मोबदल्यात हे लक्ष्य पार केले होते.

ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमचा विक्रम
मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्डवर आतापर्यंत 51 सामने झाले आहेत आणि येथे सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम इंग्लंडच्या नावावर आहे. त्यांनी याच वर्षी अफगाणिस्ताविरुद्ध 6 बाद 397 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघाचा क्रमांक येतो. त्यांनी पाकिस्तानविरुद्ध 5 बाद 336 धावा केल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका ( 6/325) आहे. 

Web Title: ICC World Cup 2019: world cup winner get how many prize money ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.