ICC World Cup 2023 : पाकिस्तानची धमकी अन् ICCची वन डे वर्ल्ड कप भारताबाहेर खेळवण्याची तयारी; जाणून घ्या ट्विस्ट

भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेवर नवं संकट ओढावलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात ICC अॅक्शन मोडमध्ये आली आहे आणि कदाचित ते वन डे वर्ल्ड कप भारताबाहेर हलवू शकता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 09:53 AM2022-12-17T09:53:53+5:302022-12-17T09:54:17+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2023: BCCI-ICC Tax Row, ICC could shift 50-over World Cup 2023 out of India  | ICC World Cup 2023 : पाकिस्तानची धमकी अन् ICCची वन डे वर्ल्ड कप भारताबाहेर खेळवण्याची तयारी; जाणून घ्या ट्विस्ट

ICC World Cup 2023 : पाकिस्तानची धमकी अन् ICCची वन डे वर्ल्ड कप भारताबाहेर खेळवण्याची तयारी; जाणून घ्या ट्विस्ट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC World Cup 2023 : भारतीय संघ २०२३च्या आशिया चषक स्पर्धेसाठी येणार नसेल तर आम्ही २०२३च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतात येणार नाही, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी घेतलेल्या पवित्र्यानंतर बरंच काही घडलं. BCCI सचिव जय शाह यांनी टीम इंडियाला पाकिस्तान दौऱ्यावर पाठवणार नसल्याचे जाहीर करताच सुरू झालेला हा वाद... राज यांनी धमकी दिली खरी, परंतु त्यांना कोण भाव देत नसल्याचे उमजले अन् त्यांची भाषा मवाळ झाली. पण, आता भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेवर नवं संकट ओढावलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात ICC अॅक्शन मोडमध्ये आली आहे आणि कदाचित ते वन डे वर्ल्ड कप भारताबाहेर हलवू शकतात, अशी शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामागे कारण जुनेच आहे आणि त्यावर वेळेत तोडगा न निघाल्यास ही शक्यता सत्यात उतरू शकते.

पाकिस्तानसह न्यूझीलंडनेही World Cup 2023 स्पर्धेसाठीच्या थेट पात्रतेच्या दिशेनं टाकलं पाऊल

BCCI-ICC Tax Row आयसीसी आणि बीसीसीआय यांच्यात स्पर्धेला कर सवलत मिळावी यावरून पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. केंद्र सरकारकडून BCCI ने कर सवलतीवर तोडगा काढावा अशी आयसीसीची मागणी आहे. २०१६च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धे दरम्यानही हीच समस्या निर्माण झाली होती आणि बीसीसीआयला तेव्हा त्यावर तोडगा काढता आला नव्हता. पण, ICC ने कडक पवित्रा घेताना बीसीसीआयच्या वार्षिक हिस्स्यातून १९० कोटी कापून घेतले होते. २०२३च्या वर्ल्ड कप स्पर्धा आयोजनादरम्यान  आयसीसीला २१.८४ टक्के म्हणजेच जवळपास ९०० कोटी कर भरावा लागणार आहे. बीसीसीआयने यावेळेस केंद्र सरकारसोबत यावर तोडगा न काढल्यास ९०० कोटी कर भरावा लागेल आणि ICC पुन्हा त्याची वसूली ही BCCIच्या वार्षिक हिस्स्यातून करेल.  

''हा बीसीसीआयचा पैसा आहे. त्यामुळे वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी यावर तोडगा न काढल्यास  ICC बीसीसीआयच्या हिस्स्यातून ही रक्कम वजा करेल. मग त्यानंतर कदाचित कायदेशीर लढाई सुरू होऊ शकते,''असे सूत्रांनी News18 ला सांगितले. आयसीसीच्या नियमानुसार आयोजकांनी संबंधित सरकारकडून कर सवलत मिळवायची असते. तुर्तास तरी बीसीसीआयने या दृष्टीने कोणतीच पाऊले उचलली नसल्याचे दिसत आहे. उलट, बीसीसीआयने आयसीसीकडे त्यांच्या महसूलातून ही कराची रक्कम वजा करावी अशी विनंती केली आहे. याता यावर काहीच तोडगा न निघाल्यास, आयसीसी ही स्पर्धा इतरत्र हलवण्याचा विचार करू शकेल. 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    
   

Web Title: ICC World Cup 2023: BCCI-ICC Tax Row, ICC could shift 50-over World Cup 2023 out of India 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.