ICC World Cup 2023: वर्ल्डकप २०२३ च्या वेळापत्रकाबाबत समोर आली मोठी अपडेट 

ICC World Cup 2023: २०२३ची क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान, भारतात खेळला जाणार आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या आज अहमदाबादमध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेनंतर या स्पर्धेबाबतची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 11:01 PM2023-05-27T23:01:44+5:302023-05-27T23:02:15+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2023: Big update on World Cup 2023 schedule | ICC World Cup 2023: वर्ल्डकप २०२३ च्या वेळापत्रकाबाबत समोर आली मोठी अपडेट 

ICC World Cup 2023: वर्ल्डकप २०२३ च्या वेळापत्रकाबाबत समोर आली मोठी अपडेट 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

२०२३ची क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान, भारतात खेळला जाणार आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या आज अहमदाबादमध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेनंतर या स्पर्धेबाबतची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकपच्या वेळापत्रकाची घोषणा कधी होणार, याबाबतचा निर्णय झाला आहे.

प्रसारमाध्यमांमध्ए येत असलेल्या वृत्तानुसार चेन्नई सुपरकिंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणाऱ्या आयपीएल २०२३ च्या अंतिम सामन्यानंतर एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकपच्या ठिकाणांची घोषणा होऊ शकते. तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ च्या अंतिम फेरीनंतर वेळापत्रकाची घोषणा होऊ शकते. 

पुरुषांचा आयसीसी वनडे क्रिकेट वर्ल्डकप २०२३ ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. तर या स्पर्धेचा अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. आधी आलेल्या वृत्तानुसार २०२३च्या वर्ल्डकपमध्ये तीन नॉकआऊट सामन्यांसह एकूण ४८ सामने खेळले जातील. बीसीसीआय या क्रिकेट स्पर्धेसाठी किमान एक डझन ठिकाणांची निवड करू शकते. त्यामध्ये बंगळुरू, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, कोलकाता, लखनौ, दिल्ली, धर्मशाला, इंदूर, मुंबई आणि राजकोट यांचा समावेश आहे.

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०२३ मध्ये एकूण १० संघांचा समावेश असतो. यामध्ये भारत, इंग्लंड, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका हे संघ रँकिंगनुसार पात्र ठरले आहेत. तर झिम्बाब्वेमध्ये १८ जून ते ९ जुलैदरम्यान, होणाऱ्या पात्रता स्पर्धेत १० संघ सहभागी होणार आहेत. त्यातील अव्वल दोन संघ वर्ल्डकपसाठी पात्र ठरतील.  

 

Web Title: ICC World Cup 2023: Big update on World Cup 2023 schedule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.