Join us

ICC World Cup 2023 : भारतात वर्ल्ड कप खेळू, पण India vs Pakistan मॅच नरेंद्र मोदी स्टेडियमवर नको! पाकिस्तानचा नकार

ICC World Cup 2023 : आशिया चषक २०२३ मध्ये BCCI  ने भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवणार नसल्याचे जाहीर करताच त्यांच्याकडून वारंवार धमकी वजा इशारा देण्याचे काम सुरू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 18:01 IST

Open in App

ICC World Cup 2023 : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं ( PCB) डोकं काही ठिकाणावर दिसत नाहीए... आशिया चषक २०२३ मध्ये BCCI  ने भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवणार नसल्याचे जाहीर करताच त्यांच्याकडून वारंवार धमकी वजा इशारा देण्याचे काम सुरू आहे. भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेवर बहीष्कार टाकण्याचा इशारा दिल्यानंतर BCCI झुकतं माप देईल असा समज त्यांना झाला होता. पण, बीसीसीआयने आशिया चषकाबाबत घेतलेली भूमिका कायम राखली अन् त्यानंतर PCBचा फज्जा उडाला. जागतिक क्रिकेटमधील बीसीसीआयचे वर्चस्व पाकिस्तानही जाणून आहे, त्यामुळे टोकाची भूमिका त्यांना परवडणारी नाही. तरीही ते काही कुस्पट काढत आहेतच. आता तर भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत आम्ही खेळू, परंतु India vs Pakistan यांच्यातला हाय व्होल्टेज सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर नको, अशी भूमिका त्यांनी घेतल्याचे समजतेय.

KL Rahulच्या जागी युवा खेळाडूला मिळाली संधी; WTC Finalसाठी भारतीय संघात बदल

आशिया चषक २०२३ स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला जाहीर झाले होते आणि तेव्हाच वाद होणार, अशी शंका निर्माण झाली होती. बीसीसीआयचे सचिव जय शाह ( Jay Shah) यांनी कोणत्याही परिस्थितीत टीम इंडियाला पाकिस्तानला पाठवणार नसल्याची भूमिका घेतली. त्यानंतर PCB चे अध्यक्ष नजम सेठी यांच्याकडून वादग्रस्त विधान येत राहिले. सुरुवातीला त्यांनी तुम्ही आशिया चषकासाठी पाकिस्तानात येणार नसाल तर आम्ही वन डे वर्ल्ड कपसाठी भारतात येणार नसल्याची भूमिका घेतली. पण, नंतर त्यांनी ती बदलली. त्यानंतर त्यांनी हायब्रिड मॉडेलचा प्रस्ताव ठेवला.

यानुसार भारताचे सामने पाकिस्तानाबाहेर होतील, पण बीसीसीआयने तेही नामंजूर केले. त्यात श्रीलंका क्रिकेट बोर्ड व बांगलादेश क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानात आशिया चषक न खेळण्याच्या बीसीसीआयच्या भूमिकेला पाठिंबा दिलाय. त्यामुळे त्यांची आधीच कोंडी झालीय. तरीही त्यांनी आता नवा प्रस्ताव ठेवल्याचे समोर येतेय.

  • भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच अहमदाबाद
  • भारत आणि ऑस्ट्रेलिया मॅच चेन्नई
  • १४ ठिकाणी होणार सामन्यांचे आयोजन
  • बांग्लादेशचे अधिक सामने कोलकाता आणि गुवाहाटीत होणार

 

भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत India vs Pakistan मॅच नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ असल्याची चर्चा आहे. त्याला आता PCB ने नकार दिलाय. ते भारतात वर्ल्ड कप खेळण्यास येणार आहेत, परंतु नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळण्यास ते तयार नसल्याचे वृत्त Dawn News ने दिले आहे. त्यांनी चेन्नई आणि बंगळुरू येथे पाकिस्तानचे सामने खेळवावेल अशी इच्छा व्यक्त केलीय. पण, त्यांनी २०२५मध्ये पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बीसीसीआयकडून लेखी हमी मागितल्याचे वृत्त खोटे असल्याचाही दावा केलाय. 

टॅग्स :आयसीसीभारत विरुद्ध पाकिस्ताननरेंद्र मोदी स्टेडियम
Open in App