भारतातील सुरक्षा तपासण्यासाठी पाकिस्तान टीम पाठवणार; त्यानंतर वर्ल्ड कप खेळण्याचा निर्णय घेणार

ICC World Cup 2023 : भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले... भारत-पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडीयमवर होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 10:59 AM2023-07-01T10:59:57+5:302023-07-01T11:00:19+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2023 : Pakistan Cricket Board to send security team to assess ODI World Cup venues, Pakistan Government yet to give ALL CLEAR | भारतातील सुरक्षा तपासण्यासाठी पाकिस्तान टीम पाठवणार; त्यानंतर वर्ल्ड कप खेळण्याचा निर्णय घेणार

भारतातील सुरक्षा तपासण्यासाठी पाकिस्तान टीम पाठवणार; त्यानंतर वर्ल्ड कप खेळण्याचा निर्णय घेणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC World Cup 2023 : भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले... भारत-पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडीयमवर होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) सुरुवातीला इथे खेळण्यास नकार दिला होता, परंतु ICC व BCCI ने त्यांना दुर्लक्षित करताच ते अहमदाबादला खेळण्यास तयार झाले. तरीही त्यांनी चेन्नई व बंगळुरू येथील सामन्यांच्या अदलाबदलीचा प्रस्ताव पाठवला, तोही अमान्य झाला. त्यांच्या या सततच्या हट्टामुळे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यास विलंब झाला होता. आता वेळापत्रक जाहीर झाले, तरीही PCB ची नाटकं काही कमी होताना दिसत नाहीत.


पाकिस्तान क्रिकेट संघाला अता पाकिस्तान सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा आहे. भारतात येण्यासाठी आम्हाला पाकिस्तान सरकारची परवानगी घ्यावी लागेल आणि त्यानंतरच आम्ही वर्ल्ड कप स्पर्धेत खेळू असे नवीन नाटक PCB ने सुरू केले आहे. आता PCB भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानच्या सामन्यांच्या ठिकाणांची सुरक्षेच्या दृष्टीने पाहणी करण्यासाठी एक टीम पाठवण्याच्या तयारीत आहेत. बाबर आजमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ वर्ल्ड कप स्पर्धेत अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, कोलकाता आणि हैदराबाद येथे होणार आहे.  


''सामन्याच्या ठिकाणांसह भारताच्या कोणत्याही दौऱ्यासाठी बोर्डाला पाकिस्तान सरकारची मंजुरी आवश्यक आहे. आम्ही आमच्या सरकारशी मार्गदर्शनासाठी संपर्क साधत आहोत आणि त्यांच्याकडून काही माहिती मिळताच आम्ही ICC ला कळवू,''असे PCBच्या प्रवक्त्याने सांगितले.  


 दोन्ही देशांमधील तणावपूर्ण राजकीय संबंधांमुळे २०१६ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपासून पाकिस्तानने भारताचा दौरा केला नाही आणि तेव्हाही पाकिस्तान भारतात येण्याबाबत अनिश्चितता होती. पीसीबीने त्यांच्या खेळाडूंना पुरवल्या जाणार्‍या सुरक्षेबाबत भारत सरकारकडून स्पष्ट आणि सार्वजनिक आश्वासन न दिल्यास स्पर्धेतून माघार घेण्याची धमकी दिली होती. या वाटाघाटींमुळे अखेरीस भारत-पाकिस्तान सामना धर्मशाला येथून कोलकात्यात हलवावा लागला होता. 


पाकिस्तानचे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक ( Pakistan WC Schedule)

६ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. क्वालिफायर १, हैदराबाद 
१२  ऑक्टोबर - पाकिस्तान वि. क्वालियर २, हैदराबाद
१५ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, अहमदाबाद
२० ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान, बंगळुरू
२३ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. अफगाणिस्तान, चेन्नई
२७ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. दक्षिण आफ्रिका, चेन्नई  
३१ ऑक्टोबर- पाकिस्तान वि. बांगलादेश, कोलकाता
४ नोव्हेंबर - न्यूझीलंड वि. पाकिस्तान, बंगळुरू
१२ नोव्हेंबर - इंग्लंड वि. पाकिस्तान, कोलकाता   


कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: ICC World Cup 2023 : Pakistan Cricket Board to send security team to assess ODI World Cup venues, Pakistan Government yet to give ALL CLEAR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.