ICC World Cup 2023 : भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे... १० शहरांमध्ये वर्ल्ड कप स्पर्धेचे सामने होणार आहेत आणि त्या त्या शहरांमधील स्टेडियमच्या नुतणीकरणालाही सुरुवात झाली आहे. ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत भारतात ही स्पर्धा होणार आहे आणि सर्वांना हवा हवासा भारत-पाकिस्तान हा सामना १५ ऑक्टोबरला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. हायव्होल्टेज सामन्यासाठी हॉटेल फुल झाले आहेत, परंतु पाकिस्तानचे अजूनही भारतात खेळायला यायचे की नाही, हे ठरलेले नाही. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद स्वतःकडे असूनही BCCI त्या ठाम भूमिकेमुळे पाकिस्तानला श्रीलंकेसोबत संयुक्त आयोजन करावे लागले आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( PCB) वर्ल्ड कप स्पर्धेत न येण्याचं कारण शोधत आहेत.
PCB चे माजी अध्यक्ष नजाम सेठी यांनी तर थेट वर्ल्ड कपवर बहिष्काराची धमकी दिलेली, परंतु BCCI व ICC ने त्यांना भीक घातली नाही. त्यानंतर अहमदाबाद येथे खेळण्यावर त्यांनी आक्षेप घेतला. तेथेही ते बॅकफूटवर गेले. PCB ने आता पाकिस्तान सरकारकडून परवानगी मिळाली, तर येणार अशी भूमिका घेतली. या सर्व वादात माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने ( Shahid Afridi) पुन्हा एकदा महत्त्वाचे विधान केले.
तो म्हणाला,'' २००५मध्ये आम्ही बंगळुरू येथे कसोटी जिंकली होती, तेव्हा आमच्या बसवर दगडफेक झाली होती. भारताविरुद्ध खेळताना प्रचंड दडपण असते, परंतु त्याने खेळताना मजाही येथे. त्यामुळे आम्ही वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतात जाणार नाही, हे असे म्हणणे चुकीचे आहे. उलट तिथे जा अन् वर्ल्ड कप जिंका.''
पाकिस्तान संघांचे वेळापत्रक६ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. श्रीलंका, हैदराबाद१२ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. नेदरलँड्स, हैदराबाद१५ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, अहमदाबाद२० ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान, बंगळुरू२३ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. अफगाणिस्तान , चेन्नई२७ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. दक्षिण आफ्रिका, चेन्नई३१ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. बांगलादेश, कोलकाता४ नोव्हेंबर - न्यूझिलंड वि. पाकिस्तान, बंगळुरू१२ नोव्हेंबर - इंग्लंड वि. पाकिस्तान, कोलकाता