पाकिस्तान झुकले! ICC, BCCI ने कोंडीत पकडले; वर्ल्ड कपचे वेळापत्रक मान्य केले

ICC World Cup 2023 Schedule:  पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची ( PCB) अवस्था 'ना घर का न घाट का' अशी झाली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 01:58 PM2023-06-26T13:58:57+5:302023-06-26T13:59:18+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2023 Schedule: PCB agrees to IND vs PAK in Ahmedabad, WC 2023 schedule out tomorrow, check  India's Tentative Schedule | पाकिस्तान झुकले! ICC, BCCI ने कोंडीत पकडले; वर्ल्ड कपचे वेळापत्रक मान्य केले

पाकिस्तान झुकले! ICC, BCCI ने कोंडीत पकडले; वर्ल्ड कपचे वेळापत्रक मान्य केले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC World Cup 2023 Schedule:  पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची ( PCB) अवस्था 'ना घर का न घाट का' अशी झाली आहे. आशिया चषक २०२३ स्पर्धेच्या यजमानपदावरून वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत खोडा घालण्याचे त्यांचे सर्व प्रयत्न फसले आहेत. भारतात येणार नाही अशी धमकी देणारी PCB नंतर अहमदाबाद येथे खेळणार नाही असा इशारा देऊ लागले. त्यात चेन्नईची मॅच बंगळुरूत आणि बंगळुरूची मॅच चेन्नईत बदलण्याचा हट्ट त्यांनी धरला. पण, त्यांचे हे सर्व प्रयत्न ICC आणि BCCI ने यशस्वी होऊ दिले नाही आणि त्यांना ठरलेलं वेळापत्रक मान्य करावे लागले. त्यामुळे आता भारत-पाकिस्तान सामना अहमदाबाद येथेच होणार आहे आणि ऑस्ट्रेलिया व अफगाणिस्तान यांच्याविरुद्धच्या लढती अनुक्रमे बंगळुरू व चेन्नई येथेच होतील.


पाकिस्तानच्या आडमुठेपणामुळे वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यास विलंब झाला होता. आता उद्या मुंबईत शानदार सोहळ्यात वर्ल्ड कप वेळापत्रकाची घोषणा होणार आहे. ''मंगळवारी वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं जाणार आहे. आयसीसीचा कार्यक्रम होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ठरलेल्या वेळापत्रकानुसार खेळण्यास तयारी दर्शवली आहे. त्यात कोणताच बदल होणार नाही,''असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. 


''भारत-पाकिस्तान सामना अहमदाबाद येथे होणार आहे. पाकिस्तानने सामना हलवण्याची विनंती केली होती, परंतु कोणताच बदल होणार नाही. या संपूर्ण स्पर्धेतील ही महत्त्वाची मॅच आहे,''असेही बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.  


भारताचा संभाव्य वेळापत्रक
भारत वि. ऑस्ट्रेलिया, ८ ऑक्टोबर, चेन्नई
भारत वि. अफगाणिस्तान, ११ ऑक्टोबर, दिल्ली 
भारत वि. पाकिस्तान, १५ ऑक्टोबर, अहमदाबाद
भारत वि. बांगलादेश, १९ ऑक्टोबर, पुणे
भारत वि. न्यूझीलंड, २२ ऑक्टोबर, धर्मशाला
भारत वि. इंग्लंड, २९ ऑक्टोबर, लखनौ
भारत वि. क्वालिफायर, २ नोव्हेंबर, मुंबई
भारत वि. दक्षिण आफ्रिका, ५ नोव्हेंबर, कोलकाता
भारत वि. क्वालिफायर, ११ नोव्हेंबर, बंगळुरू  
 

 

Web Title: ICC World Cup 2023 Schedule: PCB agrees to IND vs PAK in Ahmedabad, WC 2023 schedule out tomorrow, check  India's Tentative Schedule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.