Join us  

"ड्रेसिंग रूमला बाहेरून कडी लावा.."; वासिम अक्रमने काढली बाबरच्या पाकिस्तानी संघाची लाज

पाकिस्तानचा संघ वन-डे विश्वचषकातून जवळपास बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 11:32 AM

Open in App

Wasim Akram Pakistan : ICC World Cup 2023 मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. संघ उपांत्य फेरीतून जवळपास बाहेर पडला आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला शेवटचा साखळी सामना इंग्लंडसोबत खेळायचा आहे. या सामन्यात पाकिस्तान क्रिकेट संघासाठी असे समीकरण तयार झाले आहे, त्यामुळे त्याला उपांत्य फेरी गाठणे जवळपास अशक्यच आहे. या दरम्यान, संघाचा माजी कर्णधार वसीम अक्रमने बाबर सेनेची खिल्ली उडवत आपला राग व्यक्त केला आहे.

अक्रमने काढली पाकिस्तानची लाज!

वसीम अक्रम एका पाकिस्तानी टीव्ही शोमध्ये म्हणाला, "पाकिस्तान क्रिकेट संघाला आज क्वालिफिकेशनसाठी काही तरी खास करावं लागेल. त्यांनी इंग्लंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करावी आणि नंतर इंग्लंडला त्यांच्या ड्रेसिंग रूममध्ये बंद करून ठेवावं, त्यांना मैदानावर खेळायला येऊच देऊ नये. पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्याचा हा एकमेव मार्ग आहे," अशा शब्दांत त्याने पाकिस्तानी संघाची खिल्ली उडवली.

पाकिस्तान क्रिकेट संघाने २०२३च्या विश्वचषक स्पर्धेत चांगली सुरूवात केली होती. पण नंतर हळूहळू त्यांचा आलेख उतरता झाला. त्यातच त्यांना सलग चार सामन्यांत लाजीरवाण्या पराभवांना सामोरे जावे लागले. विश्वचषकातील निराशाजनक कामगिरीनंतर पाकिस्तानच्या अनेक माजी खेळाडूंचा बाबर आझमच्या संघावर राग आहे. सोशल मीडिया असो किंवा टीव्ही शो, सर्वत्र सध्याच्या टीमची कमतरता दाखवून त्यांची खिल्ली उडवली जात आहे.

पाकिस्तानसाठी समीकरण काय?

सेमीफायनलचे समीकरण पाकिस्तान क्रिकेट संघासाठी खूप कठीण आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानी संघाने प्रथम फलंदाजी केल्यास त्यांना किमान २८० धावांनी विजय मिळवावा लागेल. तर लक्ष्याचा पाठलाग केल्यास सामना ३ षटकांत संपवावा लागेल. अशा स्थितीत पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठणे अशक्य झाले आहे.

 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपपाकिस्तानवसीम अक्रमइंग्लंड