भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेतून झिम्बाब्वे बाहेर; पाकिस्तानने सोडला सुटकेचा निश्वास

ICC World Cup Qulifier 2023 : सध्या झिम्बाब्वेमध्ये भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकासाठी पात्रता फेरीचे सामने खेळवले जात आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 08:21 PM2023-07-04T20:21:52+5:302023-07-04T20:22:28+5:30

whatsapp join usJoin us
 ICC World Cup Qualifier 2023 Scotland thrashes Zimbabwe by 31 runs and Pakistan got big relief, read here | भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेतून झिम्बाब्वे बाहेर; पाकिस्तानने सोडला सुटकेचा निश्वास

भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेतून झिम्बाब्वे बाहेर; पाकिस्तानने सोडला सुटकेचा निश्वास

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : सध्या झिम्बाब्वेमध्ये भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकासाठी पात्रता फेरीचे सामने खेळवले जात आहेत. ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असून आशियाई किंग्ज श्रीलंकेने विश्वचषकासाठी पात्रता मिळवली आहे, तर झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज हे दोन संघ शर्यतीत होते. पण वेस्ट इंडिज पाठोपाठ आता झिम्बाब्वेचा संघ देखील आगामी विश्वचषकातून बाहेर झाला आहे. टॉप-२ संघ भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी पात्र होणार होते, यासाठी १० संघ रिंगणात होते.

आज झालेल्या सामन्यात स्कॉटलंडने झिम्बाब्वेचा पराभव करून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे स्कॉटलंड आणि नेदरलॅंड्स यांच्यात होणाऱ्या सामन्यातील विजयी संघ आगामी वन डे विश्वचषकासाठी पात्र ठरेल. लक्षणीय बाब म्हणजे झिम्बाब्वेच्या पराभवामुळे शेजारी पाकिस्तानने सुटकेचा निश्वास सोडला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण मागील वर्षी ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या ट्वेंटी-२० विश्वचषकात पाकिस्तानने झिम्बाब्वेसमोर लोटांगण घातले होते. 

झिम्बाब्वेचे आव्हान संपुष्टात
झिम्बाब्वेला वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत मंगळवारी स्कॉटलंडकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागला. झिम्बाब्वेला आज विजय मिळवून भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेची पात्रता निश्चित करता आली असती, परंतु आता त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. नेदरलँड विरुद्ध स्कॉटलंड यांच्यातला विजेता संघ वर्ल्ड कप स्पर्धेची पात्रता निश्चित करेल. श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेतील पात्रतेसाठीची एक जागा निश्चित केल्यानंतर दुसऱ्या जागेसाठी झिम्बाब्वे आघाडीवर होते. त्यात स्कॉटलंडविरुद्धची आजची लढत महत्त्वाची होती. नाणेफेक जिंकून झिम्बाब्वेने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ख्रिस्तोफर मॅकब्रीज ( २८) आणि मॅथ्यू क्रॉस ( ३८) यांनी चांगली सुरुवात करून दिली. पण, तेंदाई चतारा व सीन विलियम्स यांनी या दोघांचीही विकेट घेतली. ब्रेंडन मॅक्म्युलेन ( ३४ ) व जॉर्ज मुन्सी ( ३१) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांच्या विकेटनंतर स्कॉटलंडचा डाव गडगडला. मिचेल लिस्क ( ४८) व मार्क वॅट (२१*) हे दोघं खेळले म्हणून त्यांना ८ बाद २३४ धावांपर्यंत पोहोचता आले. सीन विलियम्सने १०-१-४१-३ अशी स्पेल टाकली.

आतापर्यंत स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या झिम्बाब्वेचीही आज कोंडी झाली. ख्रिस सोलने त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये ५ षटकांत २० धावांत ३ विकेट्स घेत झिम्बाब्वेला मोठे धक्के दिले. त्यात ब्रेंडनने १ विकेट घेऊन १० षटकांत झिम्बाब्वेची अवस्था ४ बाद ४१ अशी झाली. सिकंदर रझा हाच झिम्बाब्वेसाठी आशेचा किरण उरला होता. त्याने पाचव्या विकेटसाठी रायन बर्लसह ६१ चेंडूंत ५४ धावांची भागीदारी करून संघाला कमबॅक करून दिले. पण, ख्रिस ग्रीव्ह्सने स्कॉटलंडला ही महत्त्वाची विकेट मिळवून दिली. सिकंदर ४० चेंडूंत २ चौकार व  १ षटकारासह ३४ धावांवर बाद झाला. 

स्कॉटलंडचा ३१ धावांनी विजय 
रायन बर्ल खंबीर उभा राहिला आणि त्याने वेस्ली माधेव्हेरेसोबत खिंड लढवली. या दोघांनी ७४ चेंडूंत ७३ धावा जोडल्या. माधेव्हेरे ४० धावांवर पायचीत झाला. या विकेट नंतर झिम्बाब्वेचा डाव गडगडला. बर्ल ८३ धावांवर बाद झाला अन् सामना फिरला. झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ २०३ धावांवर तंबूत परतला. 

 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title:  ICC World Cup Qualifier 2023 Scotland thrashes Zimbabwe by 31 runs and Pakistan got big relief, read here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.