ICC World Cup Qualifier : झिम्बाब्वेच्या ४०८ धावा! टीम इंडियाचा ९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, सीन विलियम्सनच्या १७४ धावा

ICC World Cup Qualifier : आयसीसी वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत झिम्बाब्वेचा संघ काही केल्या कुणाला ऐकत नाहीए...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 04:19 PM2023-06-26T16:19:02+5:302023-06-26T16:19:44+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup Qualifier: ZIMBABWE SCORED 400 FOR THE FIRST TIME IN ODI, 36-year-old Sean Williams scored 174(101) with 21 fours and 5 sixes vs United States | ICC World Cup Qualifier : झिम्बाब्वेच्या ४०८ धावा! टीम इंडियाचा ९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, सीन विलियम्सनच्या १७४ धावा

ICC World Cup Qualifier : झिम्बाब्वेच्या ४०८ धावा! टीम इंडियाचा ९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, सीन विलियम्सनच्या १७४ धावा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC World Cup Qualifier : आयसीसी वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत झिम्बाब्वेचा संघ काही केल्या कुणाला ऐकत नाहीए... दोन वेळच्या वर्ल्ड कप विजेत्या वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर यजमानांनी आज पुन्हा वादळी खेळी केली. अ गटात आतापर्यंत तिन्ही सामने जिंकून झिम्बाब्वेने अव्वल स्थान पटकावले आहे आणि सुपर सिक्समधील स्थानही निश्चित केले आहे. त्यांची ही घोडदौड आजच्या अमेरिकेविरुद्धच्या सामन्यातही कायम दिसतेय.. वन डे क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा विक्रम त्यांनी आज केलाय. अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात त्यांनी आज चारशेपार धावा उभ्या केल्या. 


जॉयलॉर्ड गुम्बी आणि इनोसेंट काइया ( ३२) यांनी संघाला चांगली सुरूवात करून देताना पहिल्या विकेटसाठी ५६ धावा जोडल्या.     जॉयलॉर्ड व कर्णधार सीन विलियम्सन यांनी दुसऱ्या विकेटसाठी १६० धावांची भागीदारी करताना अमेरिकेच्या गोलंदाजांना बेक्कार कुटले. जॉयलॉर्ड ७८ धावांवर माघारी परतल्यानंतर विलियम्स आणि फॉर्मात असलेल्या सिकंदर रझाची बॅट तळपली. रझाने २७ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४८ धावा कुटल्या. रायन बर्लने १६ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ४७ धावांची आतषबाजी केली.

सीन द्विशतक झळकावेल असे वाटत होते, परंतु तो १०१ चेंडूंत २१ चौकार व ५ षटकारांसह १७४ धावांवर बाद झाला. झिम्बाब्वेने ६ बाद ४०८ धावा केल्या. वन डे क्रिकेटमधील ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या ठरली. त्यांनी भारताचा २०१४ सालचा  ( ५/४०४ वि. श्रीलंका) विक्रम मोडला. 

वेस्ट इंडिजच्याही ५ बाद ३७४ धावा
निकोलस पूरनच्या नाबाद १०४ धावांच्या जोरावर वेस्ट इंडिजने पात्रता फेरीत नेदरलँड्सविरुद्ध ५ बाद ३७४ धावा केल्या. ब्रेंडन किंग ( ७६), जॉन्सन कार्लोस ( ५४), कर्णधार शे होप ( ४७) आणि किमो पॉल ( ४६*) यांनी दमदार फलंदाजी केली. 

Web Title: ICC World Cup Qualifier: ZIMBABWE SCORED 400 FOR THE FIRST TIME IN ODI, 36-year-old Sean Williams scored 174(101) with 21 fours and 5 sixes vs United States

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.