Join us  

WTC Final: हवेत उडी घेत केएस भरतचा भन्नाट कॅच... डेव्हिड वॉर्नरही बघतच बसला!

KS Bharat catch, WTC Final 2023 IND vs AUS: वॉर्नरने चेंडू मारताच भरतने हवेत उडी घेतली अन् अफलातून झेल घेतला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2023 5:36 PM

Open in App

ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scoreboard Day 1: भारताविरूद्धच्या कसोटी विश्वविजेतेपदाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या सत्रात चांगली कामगिरी केली. वेगवान गोलंदाजांना मदत मिळणाऱ्या पिचवर रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण भारतीय वेगवान गोलंदाजांना म्हणावे तसे यश पहिल्या सत्रात मिळाले नाही. मोहम्मद सिराजने पहिली विकेट लवकर घेतली पण, उपहारापर्यंत ऑस्ट्रेलियाने २ बाद ७३ धावा करत अतिशय संयमी खेळी केली. सिराज व्यतिरिक्त शार्दुलला एक बळी मिळाला. केएस भरतने त्याचा दमदार कॅच टिपला.

प्रथम फलंदाजीला आलेले ऑस्ट्रेलियाचे दोन डावखुरे फलंदाजी अतिशय संयमाने खेळत होते. वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा दोघांनी संयमी सुरूवात केली होती. सिराजने ख्वाजा शून्यावरच माघारी धाडले. पण डेव्हिड वॉर्नर चिवट खेळी करू लागला. त्याला मार्नस लाबूशेनची चांगली साथ लाभली. या दोघांनी संघाचा डाव अधर्शतकापार पोहोचवला. वॉर्नर स्वत: देखील चाळीशी पार करून अर्धशतकाजवळ पोहोचत होता, पण त्याचा एक चुकीचा फटका त्याला नडला. शार्दुलने टाकलेला आखूड चेंडू त्याच्या अंगावर आला, त्याने बॅटने तो मारला, पण केएल भरतने संधी सोडली नाही. किपरने आपले योग्य काम करत अप्रतिम झेल टिपला आणि संघाला दुसरा बळी मिळवून दिला. त्यामुळे वॉर्नर ४३ धावांवर बाद झाला. पाहा व्हिडीओ-

--

दरम्यान, आज दोन्ही संघांच्या कर्णधारांनी एकाच सामन्यात आपल्या नावावर एकच कामगिरी केली. रोहित शर्मा आणि पॅट कमिन्स मैदानात उतरताच त्यांच्या नावावर मोठी कामगिरी नोंदवली गेली. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारांशी संबंधित हा विक्रम त्यांच्या कसोटी सामन्याशी संबंधित ठरला. WTC अंतिम सामना रोहित आणि कमिन्स या दोघांच्या कारकिर्दीतील 50 वा कसोटी सामना आहे. त्यामुळे दोन्ही कर्णधारांचा एकाच सामन्यात अर्धशतकी सामना असण्याचा योगायोग घडण्याची ही बहुतेक पहिलीच वेळ असेल.

ICC World Test Championship Final 2023, WTC Final, WTC final 2023 Ind vs AUS, IND vs AUS Live Match, IND Vs AUS Live Test match, IND vs AUS Test Match Live, IND vs AUS Scorecard, IND vs AUS Live updates

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाशार्दुल ठाकूरडेव्हिड वॉर्नररोहित शर्माभारतीय क्रिकेट संघ
Open in App