ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scoreboard Day 1: भारतीय गोलंदाजांच्या वेगवान माऱ्यापुढे कसोटी विश्वविजेतेपदाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने चांगली सुरूवात केली. वेगवान गोलंदाजांना मदत मिळणाऱ्या पिचवर रोहित शर्माने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण भारतीय गोलंदाजांना योग्य ती गती मिळाली नाही. त्यामुळे उपहारापर्यंत ऑस्ट्रेलियाने २ बाद ७३ धावा केल्या होत्या. पण उपहारानंतर लगेच, भारताला तिसरे यश मिळाले. मोहम्मद शमीने अतिशय योग्य पद्धतीने मार्नस लाबूशेनला आपल्या जाळ्यात अडकवले.
फलंदाजीला आलेले ऑस्ट्रेलियाचे दोन डावखुरे फलंदाजी अतिशय संयमाने खेळत होते. पण उस्मान ख्वाजा शून्यावरच बाद झाला. त्यानंतर मार्नस लाबूशेन आणि डेव्हिड वॉर्नर दोघांनी चिवट खेळी केली. उपाहाराच्या काही मिनिटं आधी वॉर्नर ४३ धावांवर बाद झाला. त्याला किपर भरतने अतिशय उत्तम झेल घेत बाद केले. त्यानंतर लाबूशेन आणि स्मिथ यांच्यात हळूहळू भागीदारी होऊ लागली होती. पण शमीने आपल्या स्विंगची जादू दाखवत संघाला यश मिळवून दिले. लाबूशेन ड्राईव्ह करायच्या प्रयत्नात असताना त्याला चेंडू कळलाच नाही. त्यामुळे स्विंग गोलंदाजीवर तो त्रिफळाचीत झाला आणि २६ चेंडूवर माघारी परतला. पाहा व्हिडीओ-
--
कसे असेल पाच दिवसाचे हवामान
सामन्यादरम्यान हवामान पाहिल्यास सामना सुरू होईल त्या दिवशी हवामान स्वच्छ असेल आणि पावसाची शक्यता नाही. दुसऱ्या दिवशीही पावसाची शक्यता नाही. तिसऱ्या दिवशीही तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे पण तरीही पावसाची भीती नाही. चौथ्या आणि पाचव्या दिवशी थोडीशी अडचण येऊ शकते. चौथ्या दिवशी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. तर पाचव्या दिवशीही पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या दिवशी 1.4 मिमी पर्यंत पाऊस पडू शकतो.
ICC World Test Championship Final 2023, WTC Final, WTC final 2023 Ind vs AUS, IND vs AUS Live Match, IND Vs AUS Live Test match, IND vs AUS Test Match Live, IND vs AUS Scorecard, IND vs AUS Live updates