Join us  

WTC Final: स्मिथचा टीम इंडियाला जोरदार 'पंच'! एक शतक ठोकत केले 5 पराक्रम

Steve Smith Century, WTC Final 2023 IND vs AUS: स्टीव्ह स्मिथने फायनलमध्ये २२९ चेंडूत झळकावले शतक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2023 3:59 PM

Open in App

Steve Smith Century Records, ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scoreboard Day 1: ट्रॅव्हिस हेडनंतर स्टीव्ह स्मिथनेही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात शतक झळकावले. यासह, कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा तो हेडनंतरचा जगातील दुसरा फलंदाज ठरला. त्याने 229 चेंडूत 100 धावा पूर्ण केल्या. पहिल्या दिवशी तो 95 धावांवर होता, दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताच त्याने सिराजचा सामना केला आणि त्याच्या 2 चेंडूत सलग 2 चौकार मारून त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 31 वे शतक झळकावले.

स्मिथने हेडसोबत 250 हून अधिक धावांची भागीदारी केली. कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील ही सर्वात मोठी भागीदारी आहे. उस्मान ख्वाजा, डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लॅबुशेन यांच्या रूपाने ऑस्ट्रेलियाला ७६ धावांवर तीन धक्के बसले. यानंतर ट्रॅव्हिस हेडसह त्याने 285 धावांची भागीदारी केली आणि ऑस्ट्रेलियाची बाजू मजबूत केली. स्मिथने एका शतकासह अनेक विक्रम केले.

1. आयसीसीच्या बाद फेरीत स्मिथच्या भारताविरुद्ध आणखी एक शतक झळकावले. 2015 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतही त्याने भारताविरुद्ध शतक झळकावले होते.

2. स्मिथचे हे भारताविरुद्धचे 9वे कसोटी शतक आहे. भारताविरुद्ध 9 कसोटी शतके झळकावणारा तो सर्वात वेगवान फलंदाज ठरला आहे. त्याने 37 डावात ही कामगिरी केली. भारताविरुद्ध जो रूटने 45 डावांत 9 शतके, गॅरी सोबर्सने 30 डावांत 8, व्हिव्ह रिचर्ड्सने 41 डावांत 8 आणि रिकी पाँटिंगने 51 डावांत 8 शतके झळकावली.

3. स्मिथ हा फॅब 4 मध्ये सर्वाधिक कसोटी शतके करणारा फलंदाज आहे. त्याच्या नावावर 31, रूटच्या नावावर 29 आणि विराट कोहली आणि केन विल्यमसनच्या नावावर 28-28 शतके आहेत.

4. या एका शतकासह स्मिथने पाँटिंग, विराट कोहली आणि सुनील गावस्कर यांना मागे टाकले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्यात सर्वाधिक शतके ठोकणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. सचिन तेंडुलकर ११ शतकांसह अव्वल स्थानावर आहे. स्मिथच्या नावावर 9 शतके आहेत. तर गावस्कर, कोहली आणि पाँटिंग या तिघांनीही ८-८ शतके झळकावली.

5. इंग्लंडमध्ये सर्वाधिक कसोटी शतके करणारा स्मिथ डॉन ब्रॅडमननंतरचा दुसरा परदेशी फलंदाज ठरला आहे. ब्रॅडमन यांनी 30 डावात 11 शतके झळकावली होती. तर स्मिथने 31 डावात 7 शतके ठोकली. स्टीव्ह वॉने 32 डावात इतकीच शतके झळकावली होती.

ICC World Test Championship Final 2023, WTC Final, WTC final 2023 Ind vs AUS, IND vs AUS Live Match, IND Vs AUS Live Test match, IND vs AUS Test Match Live, IND vs AUS Scorecard, IND vs AUS Live updates

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियास्टीव्हन स्मिथरोहित शर्माआॅस्ट्रेलिया
Open in App