ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scoreboard Day 1: ज्या दिवसाची सारेच क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत होते तो दिवस अखेर आला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया ओव्हलच्या मैदानावर उतरली. सामन्याचा पहिला कौल भारताच्या दिशेने झुकला. रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अर्ध्या तासानंतर दोन्ही संघ मैदानावर उतरले, त्यावेळी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी हातावर काळ्या पट्ट्या बांधलेल्या दिसल्या. मुख्य बाब म्हणजे, केवळ भारतीय संघच नाही तर ऑस्ट्रेलियन संघही काळ्या पट्टी बांधून मैदानात उतरला. जाणून घेऊया यामागचे कारण.
इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ कसोटी सामना खेळायला उतरला. गेले चार दिवस दोनही संघ प्राण पणाला लावून सराव करण्यात मग्न होते. दोन्ही संघांची आपल्या पहिल्यावहिल्या विजेतेपदावर नजर आहे. पण जागतिक स्तरावर क्रिकेट खेळताना दोन्ही संघ आपले सामाजिक भान विसरले नाहीत. दोन्ही संघांनी ओडिशा रेल्वे अपघातात प्राण गमावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली. नुकताच ओडिशात मोठा रेल्वे अपघात झाला. सुमारे 300हून अधिक लोक मरण पावले. त्याच वेळी, हजारांहून अधिक लोक जखमी झाले. ही घटना पाहून संपूर्ण भारत हादरला. त्यातील मृतांना आदरांजली म्हणून दोन्ही संघांच्या खेळाडूंनी काळ्या पट्ट्या बांधल्या.
भारतीय संघ- शुबमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, एस भरत (विकेटकीपर), रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, मोहम्मद शमी
ऑस्ट्रेलियन संघ- डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबूशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रे़व्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, नॅथन लियॉन, स्कॉट बोलंड
ICC World Test Championship Final 2023, WTC Final, WTC final 2023 Ind vs AUS, IND vs AUS Live Match, IND Vs AUS Live Test match, IND vs AUS Test Match Live, IND vs AUS Scorecard, IND vs AUS Live updates
Web Title: ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 1 Team India wearing black armbands along with Australian players
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.