WTC Final: ट्रेव्हिस हेडचे झुंजार अर्धशतक; ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजांना रडवलं...

Travis Head Fifty, WTC Final 2023 IND vs AUS: भारतीय गोलंदाजांची 'हवा टाईट', ट्रेव्हिस हेड-स्टीव्ह स्मिथची नाबाद ९४ धावांची भागीदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 07:56 PM2023-06-07T19:56:47+5:302023-06-07T19:57:35+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 1 Travis Head fifty helps Australia to get stronger Indian bowlers looking dull  | WTC Final: ट्रेव्हिस हेडचे झुंजार अर्धशतक; ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजांना रडवलं...

WTC Final: ट्रेव्हिस हेडचे झुंजार अर्धशतक; ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजांना रडवलं...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scoreboard Day 1: भारतीय गोलंदाजांच्या वेगवान माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियन फलंदाजी ढेपाळेल असा अंदाज अनेकांनी पिचचे फोटो पाहून व्यक्त केले होते. पण प्रत्यक्षात उलटेच झाले. रोहित शर्माने अपेक्षेप्रमाणे प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या सत्रात भारत-ऑस्ट्रेलियाने समतोल साधला. पण दुसऱ्या सत्रात सुरूवातीचा काही काळ वगळता, ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी चांगलेच पुनरागमन केले. ट्रेव्हिस हेडने अप्रतिम फलंदाजी करत अर्धशतक ठोकले. त्याला स्टीव्ह स्मिथची चांगली साथ लाभली. त्यामुळेच या दोघांमध्ये नाबाद ९४ धावांची भागीदारी झाली. तर चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाने ३ बाद १७० धावांपर्यंत मजल मारली.

कसोटी विश्वविजेतेपदाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने चांगली सुरूवात केली. वेगवान गोलंदाजांना मदत मिळणाऱ्या पिचवर रोहित शर्माने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण भारतीय गोलंदाजांना योग्य ती गती मिळाली नाही. सलामीवीर उस्मान ख्वाजा शून्यावर बाद झाला. पण त्यानंतर मार्नस लाबूशेन आणि डेव्हिड वॉर्नर दोघांनी चिवट खेळी केली. वॉर्नर ४३ धावांवर बाद झाला. त्याला भरतने झेलबाद केले. दुसऱ्या सत्राच्या सुरूवातीला लाबूशेनचा त्रिफळा मोहम्मद शमीने उडवला. त्याला २६ धावाच करता आल्या. पण त्यानंतर सामना ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेडने आपल्या ताब्यात घेतला. त्याने चहापानापर्यंत ७५ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने नाबाद ६० धावा केल्या. स्टीव्ह स्मिथने दुसरी बाजू लावून धरत १०२ चेंडूत नाबाद ३३ धावा केल्या.

दुसऱ्या सत्राच्या शेवटच्या काही मिनिटांत रविंद्र जाडेजाला चांगली फिरकी मिळाली. त्यामुळे अश्विन-जाडेजा जोडी मैदानात असती तर भारताला मदत झाली असती असाही सूर दिसला. पण आता आजच्या तिसऱ्या सत्रात रोहित शर्माला काहीतरी खास रणनीती आखावी लागेल असे दिसते.

संघात अश्विन का नाही?

अश्विन हा जगातील नंबर 1 कसोटी गोलंदाज आहे आणि असे असूनही त्याला फायनलच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. रोहित शर्माने असं का केलं? अश्विनला वगळण्याचे कारण काय होते? या प्रश्नांची उत्तरे खुद्द रोहितनेच दिली. नाणेफेकीनंतर जेव्हा रोहित शर्माला अश्विनला वगळण्यामागचे कारण विचारण्यात आले तेव्हा त्याने सांगितले की हा निर्णय कठीण होता पण परिस्थिती लक्षात घेता त्याला चार वेगवान गोलंदाजांची निवड करावी लागली. रोहित शर्मा म्हणाला की अश्विन हा मॅचविनर आहे यात वादच नाही आणि वर्षानुवर्षे तो आम्हाला सामने जिंकून देत आहे. पण आम्हाला संघाच्या गरजा लक्षात ठेवाव्या लागतात. त्यानुसार आम्हाला अश्विनला संघात घेता आले नाही.

ICC World Test Championship Final 2023, WTC Final, WTC final 2023 Ind vs AUS, IND vs AUS Live Match, IND Vs AUS Live Test match, IND vs AUS Test Match Live, IND vs AUS Scorecard, IND vs AUS Live updates

Web Title: ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 1 Travis Head fifty helps Australia to get stronger Indian bowlers looking dull 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.