Join us  

WTC Final: ट्रेव्हिस हेडने टीम इंडियाला ठोकून काढलं... शतकासह केला मोठ्ठा पराक्रम!

Travis Head Century, WTC Final 2023 IND vs AUS: टेव्हिस हेडने स्टीव्ह स्मिथच्या साथीने गोलंदाजांचा घेतला समाचार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2023 9:28 PM

Open in App

Travis Head Century, ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scoreboard Day 1: पहिल्या दोन सत्रात ऑस्ट्रेलियाने दमदार खेळ केल्यानंतर तिसऱ्या सत्रातही तीच कथा पुढे सुरू राहिली. ट्रेव्हिस हेडने १०६ चेंडूत शतक ठोकले आणि इतिहास रचला. भारतासाठीही डोकेदुखी ठरलेला ट्रेव्हिस हेड याने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवशी गोलंदाजांना धू धू धुतलं आणि धडाकेबाज शतक ठोकले. कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे सहावे शतक ठरले. त्याशिवाय, ऑस्ट्रेलियाबाहेर ते त्याचे पहिलेच कसोटी शतक ठरले.

हेडच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या सत्रातही भारतावर हल्लाबोल केला. त्याने दुसऱ्या सत्रात क्रीजवर येऊन संपूर्ण सत्रात भारताला अडचणीत आणले. पहिल्याच चेंडूपासून तो वेगळ्या मूडमध्ये दिसला आणि आक्रमक फलंदाजी करताना दिसला. त्याने अवघ्या 60 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. त्यानंतर शेवटच्या सत्रात वेग वाढला. तिसऱ्या सत्रात त्याने चांगलीच गती पकडली. हेडने १०६ चेंडूत शतक पूर्ण केले. हेड त्याच्या शतकापासून 4 धावा दूर असताना सिराजचा चेंडू त्याच्या हेल्मेटला लागला; त्यावर तो थोडासा अडचणीत दिसला, पण तपासानंतर त्याने पुन्हा फलंदाजी केली आणि शतक पूर्ण केले.

स्टीव्ह स्मिथनेदेखील हेडला अतिशय चांगल्या पद्धतीने साथ दिली. त्याने दुसऱ्या बाजूने अतिशय संथगतीने खेळ सुरू ठेवला. हेडच्या फटकेबाजीला त्याने त्याच्या बचावात्मक खेळीच्या साथीने चांगलाच आकार दिला. त्यामुळेच या दोघांनी नाबाद दीडशतकी भागीदारी केली. त्याने १४५ चेंडूत अतिशय संथपणे अर्धशतक पूर्ण केले.

भारतीय संघ- शुबमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, एस भरत (विकेटकीपर), रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, मोहम्मद शमी

ऑस्ट्रेलियन संघ- डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबूशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रे़व्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, नॅथन लियॉन, स्कॉट बोलंड

ICC World Test Championship Final 2023, WTC Final, WTC final 2023 Ind vs AUS, IND vs AUS Live Match, IND Vs AUS Live Test match, IND vs AUS Test Match Live, IND vs AUS Scorecard, IND vs AUS Live updates

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियास्टीव्हन स्मिथआॅस्ट्रेलियारोहित शर्मा
Open in App