Travis Head Steve Smith, ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scoreboard Day 1: कसोटी विश्वविजेतेपदाच्या सामन्यात पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेतला. पहिल्या अर्ध्या तासात भारतीय गोलंदाजांचा वरचष्मा राहिला. त्यानंतर मात्र ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी मनसोक्त फटकेबाजी केली. ट्रेव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ जोडीने भारतीय गोलंदाजांना नाबाद २५१ धावांचा आहेर दिला. त्याच जोरावर पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ३ बाद ३२७ धावांपर्यंत मजल मारली.
रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी घेतली. पहिल्या काही षटकांत हा निर्णय योग्य वाटला. सिराजने सलामीवीर उस्मान ख्वाजाला शून्यावर माघारी धाडले. पण त्यानंतर डेव्हिड वॉर्नरने चिवट खेळ केला. मार्नस लाबूशेनच्या साथीने तो खेळपट्टीवर टिकून राहिला. वॉर्नर ६० चेंडूत ८ चौकारांसह ४३ धावा काढून बाद झाला. शार्दुलने त्याला किपर भरतकरवी झेलबाद केले. नंतर लाबूशेनचा २६ धावांवर मोहम्मद शमीने त्रिफळा उडवला. त्यामुळे ऑस्ट्रेलिया ३ बाद ७६ या धावसंख्येवर होती. पण त्यानंतर बाजी पलटली.
ट्रेव्हिस हेड खेळायला आला आणि त्याने प्रत्युत्तराचा हल्लाच चढवला. वेगाने धावा जमवत त्याने आधी ६० चेंडूत अर्धशतक ठोकले. त्यानंतर तीच लय कायम ठेवत त्याने प्रत्येक गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेतला. त्याने १०६ चेंडूत शतक झळकावले. WTC फायनलमध्ये शतक ठोकणारा तो पहिला खेळाडू ठरला. त्याला साथ देताना स्टीव्ह स्मिथने १४५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर दोघांनीही फटकेबाजी सुरूच ठेवली. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा, ट्रेव्हिस हेड १५६ चेंडूत २२ चौकार आणि एका षटकारासह नाबाद १४६ धावांवर आणि स्टीव्ह स्मिथ २२७ चेंडूत १४ चौकारांसह नाबाद ९५ धावांवर खेळत आहे. या दोघांमध्ये २५१ धावांची नाबाद भागीदारीही झाली आहे.
ICC World Test Championship Final 2023, WTC Final, WTC final 2023 Ind vs AUS, IND vs AUS Live Match, IND Vs AUS Live Test match, IND vs AUS Test Match Live, IND vs AUS Scorecard, IND vs AUS Live updates
Web Title: ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 1 Travis Head Steve Smith brutally slammed Indian bowlers
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.