Join us  

WTC Final: नंबर 1 टेस्ट गोलंदाज अश्विन संघाबाहेर का? रोहित शर्माने स्पष्टपणे दिलं उत्तर

R Ashwin WTC Final: संघात एकमेव स्पिनर म्हणून रविंद्र जाडेजाला मिळाली संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2023 4:46 PM

Open in App

Ravichandran Ashwin Out, ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scoreboard Day 1: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ज्याची शंका होती तेच घडले. टीम इंडियाने रविचंद्रन अश्विनला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले. ओव्हलवर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या विजेतेपदाच्या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हनची घोषणा करताच अश्विनच्या चाहत्यांना वाईट वाटले. अश्विन हा जगातील नंबर 1 कसोटी गोलंदाज आहे आणि असे असूनही त्याला फायनलच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. रोहित शर्माने असं का केलं? अश्विनला वगळण्याचे कारण काय होते? या प्रश्नांची उत्तरे खुद्द रोहितनेच दिली.

नाणेफेकीनंतर जेव्हा रोहित शर्माला अश्विनला वगळण्यामागचे कारण विचारण्यात आले तेव्हा त्याने सांगितले की हा निर्णय कठीण होता पण परिस्थिती लक्षात घेता त्याला चार वेगवान गोलंदाजांची निवड करावी लागली. रोहित शर्मा म्हणाला की अश्विन हा मॅचविनर आहे यात वादच नाही आणि वर्षानुवर्षे तो आम्हाला सामने जिंकून देत आहे. पण आम्हाला संघाच्या गरजा लक्षात ठेवाव्या लागतात. त्यानुसार आम्हाला अश्विनला संघात घेता आले नाही.

ही बाब अश्विनच्या विरोधात गेली...

ओव्हलच्या खेळपट्टीवरील गवत आणि तिथला बाऊन्स अश्विनच्या विरोधात गेला. इंग्लंडमध्ये चेंडू स्विंग होतो, त्यामुळे अतिरिक्त वेगवान गोलंदाजा खेळवणे आवश्यक होते. त्यामुळे शार्दुलला स्थान मिळाले. गेल्या दोन वर्षात जाडेजाने बॅटने ताकद दाखवली आहे आणि जाडेजा हा संघातील एकमेव डावखुरा फलंदाज आहे त्यामुळे अश्विनपेक्षा जाडेजावर संघाने विश्वास दाखवला.

WTC 2021-23 मध्ये अश्विनची कामगिरी कशी होती?

WTC 2021-23 मध्ये अश्विनने भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या. अश्विनने 13 सामन्यात 61 विकेट घेतल्या. या दरम्यान तो दोन वेळा एका डावात पाच विकेट्स घेण्यास यशस्वी ठरला. पण मुद्दा असा आला की परिस्थिती आणि संघाचा समतोल यात तो फिट बसला नाही. संघ व्यवस्थापनाने अश्विनला वगळले आहे आणि चार वेगवान गोलंदाज खेळवले आहेत.

भारतीय संघ- शुबमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, एस भरत (विकेटकीपर), रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, मोहम्मद शमी

ICC World Test Championship Final 2023, WTC Final, WTC final 2023 Ind vs AUS, IND vs AUS Live Match, IND Vs AUS Live Test match, IND vs AUS Test Match Live, IND vs AUS Scorecard, IND vs AUS Live updates

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाआर अश्विनरोहित शर्माभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलिया
Open in App