Axar Patel Runout, ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scoreboard Day 2: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पहिल्या दिवशी भारतीय संघाला विकेट्ससाठी झगडावे लागले. दुसऱ्या दिवशी भारतीय संघाला या बाबतीत थोडा दिलासा मिळाला आणि पहिल्याच सत्रात ऑस्ट्रेलियाचे 4 विकेट घेण्यात यश आले. पहिल्या दिवसाच्या तुलनेत गोलंदाजांनी चांगल्या लेंग्थवर गोलंदाजी करून विकेट्स मिळवल्या. यात एक रन आऊट चांगलाच भाव खाऊन गेला. अक्षर पटेलने उत्कृष्ट फिल्डिंग करून झोपून थ्रो मारला मिचेल स्टार्कला धावबाद केले.
ओव्हलवर खेळल्या जात असलेल्या या फायनलमध्ये अक्षर पटेलला टीम इंडियामध्ये स्थान मिळाले नाही. अक्षरऐवजी या सामन्यात स्पिनर म्हणून फक्त रवींद्र जडेजाला संधी मिळाली. असे असतानाही अक्षर पटेलला मैदानात योगदान देण्याची संधी मिळताच त्याने आपले अप्रतिम कौशल्य दाखवले. पहिल्या सत्रातील शेवटच्या काही षटकांमध्ये अक्षर पटेलला क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरवण्यात आले. काही काळासाठी तो वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या जागी आला. तो काळ टीम इंडियासाठी फायदेशीर ठरला. डावाच्या 104व्या षटकात स्ट्राइक बदलण्यासाठी मिचेल स्टार्क प्रयत्न करत होता. मिड ऑफच्या दिशेने सिराजने चेंडू खेळला आणि एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. तिथे उभ्या असलेल्या अक्षरने डाइव्ह मारून चेंडू थांबवला आणि त्याच वेळी झोपून चेंडू स्टंपवर मारता स्टार्कला बाद केले. पाहा व्हिडीओ-
अक्षरच्या या पराक्रमापूर्वी भारताला ट्रेव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ या दोन महत्त्वाच्या विकेट मिळाल्या होत्या. मोहम्मद सिराजने पहिल्या दिवशी शतक झळकावणाऱ्या हेडला आपला बळी बनवले. त्याचवेळी दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला शतक झळकावणाऱ्या स्मिथला शार्दुल ठाकूरने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तसेच या सत्रातील तिसरी विकेट मोहम्मद शमीने घेतली होता. त्याने कॅमेरून ग्रीनला बाद केले होते.
Web Title: ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 2 axar patel direct hit run out mitchell starc watch video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.