Join us  

WTC Final: सिराजचा राग अनावर, स्मिथच्या दिशेने मारला चेंडू, नक्की काय झालं? (Video)

Siraj vs Smith, WTC Final 2023 IND vs AUS: सिराजने चेंडू फेकताच स्मिथदेखील उखडला, संतापून हातवारे करून लागला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2023 5:55 PM

Open in App

Siraj vs Smith, ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scoreboard Day 2: ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज स्टीव्ह स्मिथने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारताला चांगलेच रडवले. सामन्याच्या पहिल्याच दिवशी स्मिथने टीम इंडियाच्या गोलंदाजांना विकेट्ससाठी झुंजायला लावले. स्मिथने दुसऱ्या दिवशीही हाच ट्रेंड सुरू ठेवला आणि त्याचा परिणाम मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीत दिसून आला आणि रागाच्या भरात सिराजने चक्क स्मिथशी पंगा घेतला. ओव्हल येथील सामन्याचा पहिला दिवस भारतीय गोलंदाजांसाठी दमछाक करणारा होता. स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड यांनी 251 धावांची नाबाद भागीदारी करत संघाला मजबूत स्थितीत आणले. पहिल्याच दिवशी त्याने आपले शतक पूर्ण केले होते. स्मिथ फक्त 5 धावा दूर होता. दुसऱ्या दिवशी हा प्रकार घडला.

स्मिथ आपले शतक पूर्ण करेल हे निश्चित वाटत होते, पण दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच षटकात तो चौकार मारून असे करेल अशी अपेक्षा भारताने क्वचितच केली असेल. दिवसाचे पहिले षटक सिराजने केले. त्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर स्मिथने सलग चौकार मारत त्याने शतक झळकावले. या चौकारांमुळे सिराज चिडला. त्यानंतर त्याने स्मिथच्या दिशेने चेंडू फेकत राग व्यक्त केला. सिराज चौथा चेंडू टाकणार असतानाच स्मिथ शेवटच्या क्षणी क्रीजबाहेर पडला. यावर सिराजला राग आला आणि त्याने चेंडू फेकून स्टंपला मारला. स्मिथला स्पायडर कॅम दाखवायचा होता की यामुळे त्याला मागे जावे लागले, परंतु त्याचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला. पाहा व्हिडीओ-

मात्र, यानंतर काही वेळातच सिराजने ट्रॅव्हिस हेडची विकेट घेतली, तर काही वेळाने पहिल्याच सत्रात स्टीव्ह स्मिथला शार्दुल ठाकूरने बाद केले. 121 धावांची उत्कृष्ट खेळी करून स्मिथ बाद झाला.

ICC World Test Championship Final 2023, WTC Final, WTC final 2023 Ind vs AUS, IND vs AUS Live Match, IND Vs AUS Live Test match, IND vs AUS Test Match Live, IND vs AUS Scorecard, IND vs AUS Live updates

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामोहम्मद सिराजस्टीव्हन स्मिथभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलिया
Open in App