Join us  

WTC Final: हेड-स्मिथच्या दणक्यानंतर सिराजचा बळींचा चौकार! कांगारूंनी ठोकल्या 469 धावा

Head Smith Siraj, WTC Final 2023 IND vs AUS: ऑस्ट्रेलियन दणक्यानंतर भारतीय गोलंदाजांचे झुंजार पुनरागमन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2023 6:50 PM

Open in App

Head Smith Siraj, ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scoreboard Day 2: भारतीय गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अखेर ४६९ धावांवर आटोपला. ट्रेव्हिस हेडच्या १६३ धावा, स्टीव्ह स्मिथच्या १२१ धावा आणि अलेक्स कॅरीच्या ४८ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने साडेचारशेपार मजल मारली. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या दिशेने झुकलेल्या सामन्यात दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी पुनरागमन केले. सिराजने आघाडीवर राहत सर्वाधिक ४ बळी टिपले.

रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सिराजने सलामीवीर उस्मान ख्वाजाला शून्यावर माघारी धाडले. त्यानंतर डेव्हिड वॉर्नरने चिवट खेळ केला. तो ६० चेंडूत ८ चौकारांसह ४३ धावा काढून बाद झाला. पाठोपाठ लाबूशेनही २६ धावांवर त्रिफळाचीत झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलिया ३ बाद ७६ या धावसंख्येवर होती. पण त्यानंतर बाजी पलटली. स्टीव्ह स्मिथ आणि ट्रेव्हिस हेड जोडीने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद २५१ धावांची भागीदारी केली. या दोघांनी दिवसाचा खेळ संपेपर्यंत ३ बाद ३२७ धावा केल्या.

दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताच, आधी स्टीव्ह स्मिथने आपले शतक पूर्ण केले. तर काही वेळात ट्रेव्हिस हेडने आपले दीडशतक झळकावले. या दोघांमध्ये २८५ धावांची भागीदारी झाल्यानंतर ट्रेव्हिस हेड बाद झाला. त्याने १७४ चेंडूत २५ चौकार आणि एका षटकारासह १६३ धावा केल्या. कॅमेरॉन ग्रीन ६ धावांवर लगेच माघारी गेला. त्यानंतर स्टीव्ह स्मिथदेखील त्रिफळाचीत झाला. त्याने २६८ चेंडूत १२१ धावा केल्या.

त्यानंतर भारतीय गोलंदाजांनीच दमदार गोलंदाजी केली. अलेक्स कॅरीने ४८ धावांची खेळी केली. पण मिचेल स्टार्क ५, नॅथन लायन ९ आणि पॅट कमिन्स ९ धावांवर बाद झाले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव ४६९ धावांवर आटोपला. सिराजने सर्वाधिक ४, शमी-शार्दुलने २-२ आणि जाडेजाने १ बळी टिपला.

ICC World Test Championship Final 2023, WTC Final, WTC final 2023 Ind vs AUS, IND vs AUS Live Match, IND Vs AUS Live Test match, IND vs AUS Test Match Live, IND vs AUS Scorecard, IND vs AUS Live updates

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामोहम्मद सिराजमोहम्मद शामीशार्दुल ठाकूर
Open in App