WTC Final: कांगारूंचा पलटवार अन् टीम इंडिया घायाळ! मराठमोळ्या अजिंक्य रहाणेवर मदार

Scott Boland Ajinkya Rahane, WTC Final 2023 IND vs AUS: दुसऱ्या दिवसअखेर भारत ५ बाद १५१, अजिंक्य रहाणे नाबाद २९

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 10:51 PM2023-06-08T22:51:17+5:302023-06-08T22:51:55+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 2 Stumps Australia scott Boland shines Marathi Ajinkya Rahane ray of hope | WTC Final: कांगारूंचा पलटवार अन् टीम इंडिया घायाळ! मराठमोळ्या अजिंक्य रहाणेवर मदार

WTC Final: कांगारूंचा पलटवार अन् टीम इंडिया घायाळ! मराठमोळ्या अजिंक्य रहाणेवर मदार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Scott Boland Ajinkya Rahane, ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scoreboard Day 2: ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ४६९ धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाने दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात ५ बाद १५१ धावा केल्या. ट्रेव्हिस हेड (१६३) आणि स्टीव्ह स्मिथ (१२१) यांच्या शतकाने ऑस्ट्रेलियाने साडेचारशे पार मजल मारली. त्यानंतर भारताचे रोहित, गिल, पुजारा, कोहली स्वस्तात बाद झाले. जाडेजाने झुंज दिली, पण त्याचे अर्धशतक हुकले. त्यामुळे आता संघाची मदार अनुभवी मराठमोळा फलंदाज अजिंक्य रहाणे याच्यावर आहे. तो नाबाद २९ धावांवर खेळत आहे तर श्रीकर भरत ५ धावांवर नाबाद आहे. ऑस्ट्रेलियाकडून पाच गोलंदाजांनी १-१ बळी टिपला.

भारतीय फलंदाजी ढेपाळली...

आजच्या दिवसाच्या खेळात रोहित शर्मा आणि शुबमन गिल या दोघांकडून भारताला खूप अपेक्षा होत्या. दोघे स्वस्तात बाद झाले. ऑस्ट्रेलियाने दोघांना बरोबर अडकवले. कर्णधार रोहित हाफ पिच चेंडूवर २६ चेंडूत १५ धावांवर बाद झाला. तर शुबमन गिल चेंडू सोडून देताना, स्विंगने त्याला वेडं बनवलं. स्कॉट बोलंडचा बाहेरचा चेंडू सोडताना चेंडू आत आला आणि त्याचा स्टंप उडवला. अगदी तसाच पुजारादेखील बाद झाला. पुजारा शांत व संयमीपणे खेळत होता. पण २५ चेंडूंवर १४ धावांवर खेळताना त्याने चेंडू सोडला आणि तो क्लीन बोल्ड झाला. त्यानंतर मिचेल स्टार्कच्या बाऊन्सर चेंडूवर विराट कोहली १४ धावांवर झेलबाद झाला. रहाणे आणि जाडेजा यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली होती, पण जाडेजा ४८ धावांवर माघारी परतला. त्यामुळे १५०च्या आतच भारताने निम्मा संघ गमावला. त्यानंतर भारताने रहाणे आणि भरतच्या बळावर दिवसअखेर ५ बाद १५१ पर्यंत मजल मारली.

ऑस्ट्रेलियन फलंदाजीने भारताला रडवलं...

दरम्यान, त्याआधी ऑस्ट्रेलियन सलामीवीर उस्मान ख्वाजा शून्यावर बाद झाला. डेव्हिड वॉर्नरने ६० चेंडूत ८ चौकारांसह ४३ धावा, तर लाबूशेनने २६ धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलिया ३ बाद ७६ या धावसंख्येवर होती. पण त्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि ट्रेव्हिस हेड जोडीने २८५ धावांची भागीदारी केली. ट्रेव्हिस हेड १७४ चेंडूत २५ चौकार आणि एका षटकारासह १६३ धावा करून बाद झाला. पाठोपाठ कॅमेरॉन ग्रीन ६ धावांवर माघारी गेला. तर स्टीव्ह स्मिथदेखील २६८ चेंडूत १२१ धावांवर तंबूत गेला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाची शेपूट भारताने झटपट गुंडाळली. अलेक्स कॅरी ४८, मिचेल स्टार्क ५, नॅथन लायन ९ आणि पॅट कमिन्स ९ धावांवर बाद झाले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव ४६९ धावांवर आटोपला. सिराजने सर्वाधिक ४, शमी-शार्दुलने २-२ आणि जाडेजाने १ बळी टिपला.

ICC World Test Championship Final 2023, WTC Final, WTC final 2023 Ind vs AUS, IND vs AUS Live Match, IND Vs AUS Live Test match, IND vs AUS Test Match Live, IND vs AUS Scorecard, IND vs AUS Live updates

Web Title: ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 2 Stumps Australia scott Boland shines Marathi Ajinkya Rahane ray of hope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.