Shami Siraj Shardul, ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scoreboard Day 1: फायनलच्या सामन्यात पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी धुलाई केल्यानंतर अखेर दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी कमबॅक केले. पहिल्या दिवशी त्रिशतकी मजल ३ बाद ३२७ धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची अवस्था दुसऱ्या दिवसाच्या उपाहारापर्यंत ७ बाद ४२२ धावांपर्यंत मजल मारता आली. दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात भारतीय वेगवान गोलंदाजांनी चांगले पुनरागन केले. ट्रेव्हिस हेडचे दीडशतक आणि स्टीव्ह स्मिथचे शतक झाल्यावर भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कमबॅक केला आणि भारताच्या सामन्यातील आशा अद्यापही पल्लवित ठेवल्या.
दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांना सुरूवातीच्या काही षटकांत मार खावा लागला. स्टीव्ह स्मिथने आपले ३१वे कसोटी शतक ठोकले. तर ट्रेव्हिस हेडने देखील आपले दीडशतक पूर्ण केले. त्यानंतर मोहम्मद सिराजने बाऊन्सरचा मारा करत अखेर हेडला १६३ धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी हल्लोबोल केला. नव्याने आलेल्या कॅमेरॉन ग्रीनवर भारतीय खेळाडूंनी दडपण आणले. तो ६ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर पिचवर सेट झालेला स्टीव्ह स्मिथदेखील चुकीच्या फटक्यामुळे बाद झाला. शार्दुल ठाकूरने त्याला टाकलेल्या चेंडूत त्याच्या बॅटला लागला आणि नंतर स्टंपवर आदळून तो त्रिफळाचीत झाला. स्मिथने २६८ चेंडूत १९ चौकारांसह १२१ धावा केल्या. तो बाद होताच मिचेल स्टार्कही धावचीत झाला. बदली खेळाडू म्हणून आलेल्या अक्षर पटेलने त्याला अप्रतिम थ्रो मारत ५ धावांवर माघारी पाठवले. त्यामुळे उपहारापर्यंत ऑस्ट्रेलिया ७ बाद ४२२ धावाच करू शकली.
त्याआधी, कालच्या दिवशी रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी घेतली. सिराजने सलामीवीर उस्मान ख्वाजाला शून्यावर माघारी धाडले. त्यानंतर डेव्हिड वॉर्नरने चिवट खेळ केला. तो ६० चेंडूत ८ चौकारांसह ४३ धावा काढून बाद झाला. पाठोपाठ लाबूशेनही २६ धावांवर मोहम्मद शमीकरवी त्रिफळाचीत झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलिया ३ बाद ७६ या धावसंख्येवर होती. पण त्यानंतर बाजी पलटली. स्टीव्ह स्मिथ आणि ट्रेव्हिस हेड जोडीने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद २५१ धावांची भागीदारी केली होती. अखेर दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात २८५ धावांची भागीदारी झाल्यानंतर हेड बाद झाला.
Web Title: ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 2 Team India pacers nice comeback in first session shami siraj shardul
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.