Ajinkya Rahane MS Dhoni, ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scoreboard Day 3: अजिंक्य रहाणे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात शतक झळकावण्यापासून वंचित राहिला. पण या खेळाडूने ओव्हलवर आपली क्षमता सिद्ध केली. त्यावेळी टीम इंडिया अडचणीत आली होती. विराट, रोहित, पुजारा यांसारखे फलंदाज नापास झाले, त्यावेळी रहाणेने क्रीजवर पाय रोवले आणि रहाणेने 89 धावांची अप्रतिम खेळी केली. टीम इंडियातून बाहेर पडल्यानंतर रहाणेने खूप मेहनत घेतली, त्यातच त्याच्या यशस्वी पुनरागमनात एमएस धोनीचा एक सल्ला कामी आला.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी संघात निवड होण्यापूर्वी अजिंक्य रहाणेनेमहेंद्रसिंग धोनीसोबत बराच वेळ घालवला होता. चेन्नई सुपर किंग्जने त्याला विकत घेतले होते आणि धोनीने IPL 2023 सुरू होण्यापूर्वी संघातील त्याच्या भूमिकेबद्दल रहाणेशी चर्चा केली. धोनीने रहाणेला अनेक गोष्टी समजावून सांगितल्या पण त्याचे 7 शब्द या रहाणेला फायद्याचे ठरले.
धोनीचे ते 7 शब्द!
अजिंक्य रहाणे चेन्नई संघात सामील होताच धोनीने त्याला सात शब्दांचा फॉर्म्युला दिला. धोनी रहाणेला म्हणाला होता, 'खेळाचा आनंद घे, टेन्शन अजिबात घेऊ नको." IPL 2023 मध्ये रहाणेच्या झंझावाती अर्धशतकानंतर धोनी म्हणाला होता की, मी त्याच्याशी बोललो होतो आणि त्याला सांगितलं होतं की- तुला फक्त तुझ्या क्षमतेनुसार खेळायचे आहे. खेळाचा आनंद घे आणि अजिबात टेन्शन घेऊ नको. या शब्दांनी रहाणेला आत्मविश्वास दिला आणि त्याने चेन्नईला IPL 2023मध्ये चॅम्पियन बनवण्यातच हातभार लावला नाही तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी संघात संधीही मिळाली.
ओव्हलच्या मैदानावर भारतीय क्रिकेट संघाने पहिल्या डावात ७१ धावांत ४ विकेट गमावल्या होत्या. यानंतर रहाणेने जाडेजासोबत पाचव्या विकेटसाठी ७१ धावा जोडल्या आणि त्यानंतर सातव्या विकेटसाठी शार्दुलसोबत शतकी भागीदारी केली. शार्दुल आणि रहाणेने 145 चेंडूत 109 धावांची भागीदारी केली. यामुळेच टीम इंडियाने 296 धावांपर्यंत मजल मारली.
ICC World Test Championship Final 2023, WTC Final, WTC final 2023 Ind vs AUS, IND vs AUS Live Match, IND Vs AUS Live Test match, IND vs AUS Test Match Live, IND vs AUS Scorecard, IND vs AUS Live updates