WTC Final: ऑस्ट्रेलियाने अतिशहाणपणा केला, भरमैदानात 'पोपट झाला'... पाहा काय झालं? (Video) 

Australia Team Embarrassing Moment, WTC Final 2023 IND vs AUS: अजिंक्य रहाणेने १२९ चेंडूत केली ८९ धावांची दमदार खेळी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 09:45 PM2023-06-09T21:45:56+5:302023-06-09T21:46:58+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 3 embarrassing moment for Australia team as Overconfident players came back in ground | WTC Final: ऑस्ट्रेलियाने अतिशहाणपणा केला, भरमैदानात 'पोपट झाला'... पाहा काय झालं? (Video) 

WTC Final: ऑस्ट्रेलियाने अतिशहाणपणा केला, भरमैदानात 'पोपट झाला'... पाहा काय झालं? (Video) 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Australia Team Come back to Ground, ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scoreboard Day 3: कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताला सतत अडचणीत आणायचा प्रयत्न केला आणि टीम इंडियावर वर्चस्व राखायची एकही संधी सोडली नाही. असे असतानाही पॅट कमिन्सच्या संघाला अनेक वेळा विचित्र प्रसंगातून जावे लागले. त्यांच्याकडून कधी तो झेल सुटले तर कधी विकेट मिळाल्यानंतर गोलंदाजाचा नो बॉल असल्याचे समजले. या साऱ्या गोष्टी कमी की काय म्हणून भरमैदानात त्यांची आणखी एका प्रसंगामुळे नाचक्की झाली. हजारो चाहत्यांसमोर ऑस्ट्रेलियन संघाला अतिशहाणपणाचं धडा मिळाला आणि पॅव्हेलियनमध्ये परतणाऱ्या खेळाडूंना गपचूप मैदानात परतावे लागले.

नक्की काय झालं?

ओव्हलवर झालेल्या फायनलच्या तिसऱ्या दिवशी भारताच्या उर्वरित ५ विकेट्स मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलियाला काही काळ संघर्ष करावा लागला. पहिल्या सत्रात एकच विकेट मिळाली, मात्र दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाला थोडा दिलासा मिळाला. या सत्रात ऑस्ट्रेलियाने भारताला ऑल आऊट केले. शेवटच्या विकेटपूर्वी विचित्र घटना घडली. कॅमेरून ग्रीनच्या चेंडूवर अखेरचा फलंदाज मोहम्मद सिराजला अंपायरने LBW आऊट दिले. ऑस्ट्रेलियन संघ पॅव्हेलियनमध्ये परत जाऊ लागला पण तोपर्यंत सिराजने DRS घेतला. DRS घेतल्याचे पाहूनही ऑस्ट्रेलियन संघाने सिराज बाद असल्याचे मानले. अतिशहाणपणा करत ते रिव्ह्यू न बघताच स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर वगैरे पॅव्हेलियनमध्ये जाऊ लागले. त्याच वेळी DRS मध्ये सिराजच्या बॅटला चेंडू लागल्याचे दिसले त्यामुळे तो नाबाद राहिला त्यामुळे पॅव्हेलियनमध्ये पोहोचलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा चांगलाच पोपट झाला आणि ते मैदानात परतले. पॅव्हेलियनच्या पायऱ्यांवरून त्यांना पुन्हा मैदानात यावे लागले.

--


 
असे असले तरी लवकरच भारताची शेवटची विकेट मोहम्मद शमीच्या रूपाने पडली आणि संघ 296 धावांत सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा केल्या आणि त्यामुळे भारतावर 173 धावांची आघाडी घेतली. अजिंक्य रहाणेने भारतासाठी 89 धावांची संस्मरणीय खेळी खेळली, ज्यामुळे टीम इंडिया काहीसे पुनरागमन करू शकली. त्याच्याशिवाय शार्दुल ठाकूरनेही ओव्हलवर सलग तिसरे अर्धशतक ठोकले.

ICC World Test Championship Final 2023, WTC Final, WTC final 2023 Ind vs AUS, IND vs AUS Live Match, IND Vs AUS Live Test match, IND vs AUS Test Match Live, IND vs AUS Scorecard, IND vs AUS Live updates

Web Title: ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 3 embarrassing moment for Australia team as Overconfident players came back in ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.