Join us  

WTC Final: खळ्ळ खट्ट्याक् ... काहीही कळायच्या आधीच केएस भरतची 'दांडी गुल' (Video)

KS Bharat, WTC Final 2023 IND vs AUS:  चेंडू टप्पा पडून उडेल असं वाटत असतानाच...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2023 4:27 PM

Open in App

KS Bharat Wicket, ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scoreboard Day 3: भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. रोहित शर्माचा तो निर्णय फसला आणि ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावा केल्या. ट्रेव्हिस हेडचे दीडशतक आणि स्टीव्ह स्मिथचं शतक याच्या बळावर त्यांनी हा डोंगर उभारला. पण या आव्हानाला प्रत्युत्तर देताना भारतीय फलंदाजी ढेपाळली. भारताचे टॉप-4 म्हणजेच रोहित, गिल, विराट, पुजारा हे चौघे २० धावांच्या टप्पाही पार करू शकले नाहीत. रविंद्र जाडेजाचे अर्धशतक हुकले पण अजिंक्य रहाणे - केएस भरत जोडीने दुसरा दिवस संपेपर्यंत गड राखला. तिसऱ्या दिवशी ही भागीदारी अजून वाढेल अशी अपेक्षा होती, पण केएस भरत दिवसाच्या दुसऱ्याच चेंडूवर काही समजण्याआधी क्लीन बोल्ड झाला.

भारताचा दुसऱ्या दिवशी डाव थांबला तेव्हा धावसंख्या १ बाद १५१ अशी होती. अजिंक्य रहाणे आणि केएस भरत तिसऱ्या दिवशी मैदानावर आले. पहिल्या चेंडूवर रहाणेने एक धाव घेतली. पण दुसराच चेंडू भारतासाठी धक्का देणारा ठरला. स्कॉट बोलँड गोलंदाजी करत होता. चेंडू हाफ पिच असल्याने टप्पा पडून कमरेच्या उंचीला येईल अशी अपेक्षा होती. पण तसे घडले नाही. केएस भरतने चेंडू अपेक्षित उंचीवर खेळायचा प्रयत्न केला. पण टप्पा पडून चेंडू खालीच राहिला. काहीही कळायच्या आत केएस भरत त्रिफळाचीत झाला आणि ५ धावांवर माघारी परतला.

त्याआधी, ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावा केल्या. प्रत्युत्तरात रोहित शर्मा आणि शुबमन गिल या दोघांकडून भारताला खूप अपेक्षा होत्या. दोघे स्वस्तात बाद झाले. ऑस्ट्रेलियाने दोघांना बरोबर अडकवले. कर्णधार रोहित हाफ पिच चेंडूवर २६ चेंडूत १५ धावांवर बाद झाला. तर शुबमन गिल चेंडू सोडून देताना, स्विंगने त्याला वेडं बनवलं. स्कॉट बोलंडचा बाहेरचा चेंडू सोडताना चेंडू आत आला आणि त्याचा स्टंप उडवला. अगदी तसाच पुजारादेखील बाद झाला. पुजारा शांत व संयमीपणे खेळत होता. पण २५ चेंडूंवर १४ धावांवर खेळताना त्याने चेंडू सोडला आणि तो क्लीन बोल्ड झाला. त्यानंतर मिचेल स्टार्कच्या बाऊन्सर चेंडूवर विराट कोहली १४ धावांवर झेलबाद झाला. रहाणे आणि जाडेजा यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली होती, पण जाडेजा ४८ धावांवर माघारी परतला. त्यामुळे १५०च्या आतच भारताने निम्मा संघ गमावला.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाअजिंक्य रहाणेआॅस्ट्रेलियारवींद्र जडेजा
Open in App