WTC Final: आवाज कुणाचा... मराठी माणसाचा! इंग्लंडमध्ये रहाणे-शार्दुलचा ऑस्ट्रेलियाला दणका

Ajinkya Rahane Shardul Thakur, WTC 2023 IND vs AUS: अजिंक्य रहाणे-शार्दुल ठाकूर जोडीने केली नाबाद शतकी भागीदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 05:12 PM2023-06-09T17:12:03+5:302023-06-09T17:13:41+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 3 Marathi Ajinkya Rahane Shardul Thakur saves Team India against Australia | WTC Final: आवाज कुणाचा... मराठी माणसाचा! इंग्लंडमध्ये रहाणे-शार्दुलचा ऑस्ट्रेलियाला दणका

WTC Final: आवाज कुणाचा... मराठी माणसाचा! इंग्लंडमध्ये रहाणे-शार्दुलचा ऑस्ट्रेलियाला दणका

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ajinkya Rahane Shardul Thakur, ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scoreboard Day 3: भारतीय संघाच्या वरच्या फळीच्या फलंदाजांनी घोर निराशा केल्यावर दोन मराठमोळ्या क्रिकेटपटूंनी टीम इंडियाला सावरले. दुसऱ्या दिवसअखेर ५ बाद १५१ अशी भारताची स्थिती होती. रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा यांच्यासारखे धुरंधर फलंदाज स्वस्तात माघारी परतले. रविंद्र जाडेजाने ४८ धावांची झुंज दिली. पण त्याचा फारसा प्रभाव पडला नाही. तिसऱ्या दिवशी मात्र केएस भरत बाद झाल्यानंतर, दिवसाचे पहिले सत्र संपेपर्यंत अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर या मराठी जोडीने खेळपट्टीवर जम बसवत शतकी भागीदारी केली आणि संघाला ६ बाद २६० धावांपर्यंत मजल मारून दिली. दोघांनाही ऑस्ट्रेलियाकडून जीवदान मिळाले. त्याचा त्यांनी योग्य वापर केला. रहाणे ८९ धावांवर नाबाद आहे तर शार्दुल नाबाद ३६ धावांवर खेळत आहे.

भारताचा मराठमोळा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याने पुन्हा एकदा आपली उपयुक्तता सिद्ध केली. भारताचा संघ संकटात असताना रहाणेने दमदार अर्धशतक ठोकत संघाची लाज राखली. भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करताना, खूप मार खाल्ला. ट्रेव्हिस हेडचे दीडशतक आणि स्टीव्ह स्मिथचं शतक याच्या बळावर पहिल्या डावात ४६९ धावा केल्या. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी निराशा केली. पण अजिंक्य रहाणेने मात्र दुहेरी विक्रमाचा धमाका केला. विश्वविजेतेपदाच्या फायनलमध्ये अर्धशतक झळकावणारा तो पहिल्या अर्धशतकवीर ठरला. तसेच डावात पुढे जात, अजिंक्यने टेस्ट क्रिकेटमध्ये ५ हजार धावांचा टप्पाही गाठला.

अजिंक्य रहाणेला शार्दुल ठाकूरने अपेक्षित साथ दिली. शार्दुलने सुरूवातीच्या काळात थोडीशी बाचकत फलंदाजी केली. त्याला दोन-तीन वेळा ऑस्ट्रेलियाकडून झेल सुटल्याने जीवदानही मिळाले. इतकेच नव्हे तर एका चेंडूवर तो पायचीत झाला होता त्यावेळी पॅट कमिन्सचा नो बॉल असल्याने तो वाचला. त्यामुळे सत्र संपेपर्यंत त्याने रहाणेला भक्कम साथ दिली. या दोघांनी नाबाद १०८ धावांची भागीदारी केली.

त्याआधी, ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावा केल्या. प्रत्युत्तरात रोहित शर्मा आणि शुबमन गिल या दोघांकडून भारताला खूप अपेक्षा होत्या. दोघे स्वस्तात बाद झाले. ऑस्ट्रेलियाने दोघांना बरोबर अडकवले. कर्णधार रोहित हाफ पिच चेंडूवर २६ चेंडूत १५ धावांवर बाद झाला. तर शुबमन गिल चेंडू सोडून देताना, स्विंगने त्याला वेडं बनवलं. स्कॉट बोलंडचा बाहेरचा चेंडू सोडताना चेंडू आत आला आणि त्याचा स्टंप उडवला. अगदी तसाच पुजारादेखील बाद झाला. पुजारा शांत व संयमीपणे खेळत होता. पण २५ चेंडूंवर १४ धावांवर खेळताना त्याने चेंडू सोडला आणि तो क्लीन बोल्ड झाला. त्यानंतर मिचेल स्टार्कच्या बाऊन्सर चेंडूवर विराट कोहली १४ धावांवर झेलबाद झाला. रहाणे आणि जाडेजा यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली होती, पण जाडेजा ४८ धावांवर माघारी परतला. त्यामुळे १५०च्या आतच भारताने निम्मा संघ गमावला. पाठोपाठ भरतही ५ धावांवर बाद झाला.

ICC World Test Championship Final 2023, WTC Final, WTC final 2023 Ind vs AUS, IND vs AUS Live Match, IND Vs AUS Live Test match, IND vs AUS Test Match Live, IND vs AUS Scorecard, IND vs AUS Live updates

Web Title: ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 3 Marathi Ajinkya Rahane Shardul Thakur saves Team India against Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.