WTC Final: 'झोपेतून उठलेला' लाबूशेन भारताची झोप उडवणार? ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत

Marnus Labuschange, WTC Final 2023 IND vs AUS: रहाणे, शार्दुलच्या अर्धशतकाने भारताची लाज राखली, पण ऑस्ट्रेलियाची सामन्यावर भक्कम पकड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 11:03 PM2023-06-09T23:03:21+5:302023-06-09T23:04:09+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 3 Marnus Labuschagne playing well as pressure mounts on Team India Rahane Shardul Rohit Siraj | WTC Final: 'झोपेतून उठलेला' लाबूशेन भारताची झोप उडवणार? ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत

WTC Final: 'झोपेतून उठलेला' लाबूशेन भारताची झोप उडवणार? ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Marnus Labuschange, ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scoreboard Day 3: कसोटी विश्वविजेतेपदाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने तिसऱ्या दिवसअखेर २९६ धावांची आघाडी घेतली असून सामन्यावरील पकड अधिक मजबूत केली आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने केलेल्या ४६९ धावांच्या प्रत्युत्तरात भारताला अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर २९६ धावाच करता आल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट पकटन गेली. त्यामुळे झोप काढत असलेला लाबूशेन झोपेतून उठून मैदानात आला आणि त्याने दिवसाचा खेळ संपेपर्यंत पिचवर तळ ठोकला. दिवस संपला तेव्हा लाबूशेनच्या नाबाद ४१ धावांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने ४ बाद १२३ धावा केल्या. त्यामुळे उद्या पहिल्या सत्रात त्याची विकेट न घेतल्यास तो भारतीय गोलंदाजांची नक्की झोप उडवू शकतो.

WTC Final: झोपाळू लाबूशेनची उडाली झोप, पाहा नक्की काय आहे धमाल किस्सा (Video)

ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात सलामीवीर डेव्हिड वॉर्नर १ धावा काढून माघारी गेला. दुसरा सलामीवीर उस्मान ख्वाजादेखील १३ धावांवर तंबूत परतला. त्यानंतर मार्नस लाबूशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यात ६२ धावांची भागीदारी झाली. जाडेजाने ही भागीदारी तोडली. त्याने आधी गेल्या डावाचा शतकवीर स्टीव्ह स्मिथला ३४ धावांवर बाद केले. त्यानंतर गेल्या डावातील दीडशतकवीर ट्रेव्हिस हेडला १८ धावांत तंबूत पाठवलं. पण या चार बळींनंतर मार्नस लाबूशेनने कॅमेरॉन ग्रीनच्या साथीने दिवसाचा खेळ संपेपर्यंत खेळपट्टीवर तग धरला आणि ऑस्ट्रेलियाला ४ बाद १२३ धावांपर्यंत नेले. नाबाद ४१ धावांवर असलेला लाबूशेन आणि नाबाद ७ धावा करणारा ग्रीन यांच्यामुळे ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसअखेर २९६ धावांची आघाडी घेतली.

तत्पूर्वी सामन्यात, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४६९ धावांवर संपला. डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबूशेन, कॅमरॉन ग्रीन या खेळाडूंनी फारसा प्रभाव पाडला नाही. पण ट्रेव्हिस हेडने सर्वाधिक १६३ धावांची दमदार खेळी केली. त्याला स्टीव्ह स्मिथची उत्तम साथ लाभली. स्मिथने १२१ धावांची अप्रतिम फलंदाजी केली. या दोघांनी २८५ धावांची भागीदारी केली. या दोघांच्यानंतर अलेक्स कॅरीने ४८ धावा करत संघाला ४६९ पर्यंत मजल मारून दिली.

या आव्हानास प्रत्युत्तर देताना पहिल्या डावात भारताचे वरच्या फळीतील रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, केएस भरत हे पाच फलंदाज स्वस्तात बाद झाले. रविंद्र जाडेजाने ४८ धावा करत झुंज दिली. पण त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर यांच्या १०९ धावांच्या भागीदारीने भारताची लाज राखली. रहाणेने ८९ तर शार्दुलने ५१ धावा केल्या. त्यामुळे भारताच्या पहिल्या डावाअखेर ऑस्ट्रेलियाने १७३ धावांची मोठी आघाडी घेतली.

ICC World Test Championship Final 2023, WTC Final, WTC final 2023 Ind vs AUS, IND vs AUS Live Match, IND Vs AUS Live Test match, IND vs AUS Test Match Live, IND vs AUS Scorecard, IND vs AUS Live updates

Web Title: ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 3 Marnus Labuschagne playing well as pressure mounts on Team India Rahane Shardul Rohit Siraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.