Marnus Labuschagne sleeping Video Viral, ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scoreboard Day 3: लंडनमध्ये WTC फायनल जिंकण्याची लढाई भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावांची मोठी धावसंख्या उभारली, त्यानंतर भारताच्या अजिंक्य रहाणे, शार्दुल ठाकूर आणि रवींद्र जडेजा यांनी चांगले डाव खेळून टीम इंडियाला 296 धावांपर्यंत नेले. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करताना सिराजने असे काही केले की एका ऑस्ट्रेलियन खेळाडूची झोपच उडाली.
पहिल्या डावात 469 धावांचा डोंगर उभारल्यानंतर भारतीय फलंदाजांचा डाव 296 धावांत आटोपले. टीम इंडियाकडून अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ८९ धावा केल्या. त्याने १२९ चेंडूंचा सामना करताना या धावा केल्या. याशिवाय शार्दुल ठाकूरनेही 51 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, तर रवींद्र जडेजाने 48 धावा केल्या. याशिवाय संघाच्या एकाही फलंदाजाला मोठी धावा करता आली नाहीत. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा दुसऱ्या डावात फलंदाजीला आले. डावाच्या पहिल्या काही षटकात ऑस्ट्रेलियन सलामीवीर चांगले खेळतील अशी त्यांची धारणा होती. पण डावाच्या चौथ्याच षटकात वॉर्नरला टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने बाद केले. यावेळी तिसऱ्या क्रमांकावर येऊ घातलेला मार्नस लबुशेन ड्रेसिंग रूममध्ये बसल्या-बसल्या झोपला होता, पण वॉर्नर आऊट होताच त्याची झोपमोड झाली आणि अचानक उठून त्याला बॅटिंगसाठी मैदानात यावे लागले. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
दरम्यान, पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया संघाने १७३ धावांची मोठी आघाडी घेतली. भारताचे वरच्या फळीतील रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, केएस भरत हे पाच फलंदाज स्वस्तात बाद झाले. रविंद्र जाडेजाने ४८ धावा करत झुंज दिली. पण त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर यांच्या १०९ धावांच्या भागीदारीने भारताची लाज राखली. रहाणेने ८९ तर शार्दुलने ५१ धावा केल्या.
ICC World Test Championship Final 2023, WTC Final, WTC final 2023 Ind vs AUS, IND vs AUS Live Match, IND Vs AUS Live Test match, IND vs AUS Test Match Live, IND vs AUS Scorecard, IND vs AUS Live updates
Web Title: ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 3 Marnus Labuschagne sleeping Video Viral Siraj dismiss David Warner
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.