Shardul Thakur Ajinkya Rahane, ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scoreboard Day 3: ऑस्ट्रेलियाच्या ४६९ धावांच्या अवाढव्य आव्हानापुढे टीम इंडियाचा पहिला डाव २९६ धावांवर संपुष्टात आला. अजिंक्य रहाणेच्या ८९ धावा, शार्दुल ठाकूरच्या ५१ धावा आणि रविंद्र जाडेजाच्या ४८ धावांच्या खेळींमुळे भारताला पहिल्या डावात तीनशेनजीक मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक ३ बळी टिपले. यात पालघरचा मुलगा शार्दुल ठाकूरने एक विशेष हॅटट्रिक केली.
शार्दुल ठाकूरची विक्रमी हॅटट्रिक!
विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारासारखे टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज सातत्याने अपयशी ठरलेल्या ओव्हल मैदानावर शार्दुल ठाकूरने अर्धशतक ठोकले. ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने ही कामगिरी केली. सुमारे अडीच वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध गाबामध्ये त्याने पहिले अर्धशतक झळकावले होते. पण आज त्याने एक खास हॅटट्रिक केली. शार्दुलने ओव्हल मैदानावर सलग तिसऱ्या डावात अर्धशतक झळकावले. दोन वर्षांपूर्वी शार्दुलने ओव्हलवरच इंग्लंडविरुद्धच्या दोन्ही डावांत धडाकेबाज अर्धशतके झळकावली होती. त्यामुळे सर डॉन ब्रॅडमन आणि अँलन बॉर्डर या दोघांनंतर ओव्हलवर असा पराक्रम करणारा शार्दुल केवळ तिसरा फलंदाज ठरला.
असा रंगला भारताचा डाव
रोहित शर्मा आणि शुबमन गिल या दोघांनी स्वस्तात आपली विकेट बहाल केली. कर्णधार रोहित २६ चेंडूत १५ धावांवर, तर शुबमन गिल १३ धावांवर बाद झाला. चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली दोघेही प्रत्येकी १४-१४ धावा करून माघारी परतले. रहाणे आणि जाडेजा यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली होती, पण जाडेजा ४८ धावांवर बाद झाला. त्यामुळे १५०च्या आतच भारताने निम्मा संघ गमावला. पाठोपाठ भरतही ५ धावांवर बाद झाला.
अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूरने लाज राखली!
अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर यांच्यात १०९ धावांची भागीदारी गेली. भारत तिसऱ्या दिवशी खेळायला आला त्यावेळी दुसऱ्याच चेंडूवर भारताचा भरत बाद झाला. त्यावेळी भारत ६ बाद १५२ वर होता. पण रहाणे-ठाकूर जोडीने सामन्यात जीव ओतला. या दोघांनी संयमी आणि वेळप्रसंगी फटकेबाजी करत संघाचा धावफलक हलता ठेवला. त्यामुळेच भारताने आधी २०० आणि मग २५०चा टप्पा गाठला. अजिंक्य रहाणेने १२९ चेंडूत ११ चौकार आणि एक षटकार खेचत ८९ धावा केल्या. रहाणेच्या साथीने शार्दुलने १०९ धावांची भागीदारी केली. रहाणे बाद झाल्यावर शार्दुलने तळाच्या फलंदाजांच्या साथीने डाव पुढे नेत अर्धशतक ठोकले. त्याने १०९ चेंडूत ६ चौकारांसह ५१ धावा केल्या. त्यानंतर मात्र उमेश यादव ५ आणि शमी १३ धावा करून बाद झाल्याने भारताचा डाव २९६ धावांवर आटोपला. पॅट कमिन्स ३, मिचेल स्टार्क, स्कॉट बोलँड आणि कॅम ग्रीन यांनी २-२ तर नॅथन लायनने १ बळी टिपला.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांना घेतला समाचार
ऑस्ट्रेलियन सलामीवीर उस्मान ख्वाजा शून्यावर बाद झाला. डेव्हिड वॉर्नर ४३ तर लाबूशेन २६ धावांवर माघारी परतला. ऑस्ट्रेलिया ३ बाद ७६ या धावसंख्येवर असताना स्टीव्ह स्मिथ आणि ट्रेव्हिस हेड जोडीने २८५ धावांची भागीदारी केली. हेडने १७४ चेंडूत २५ चौकार आणि एका षटकारासह १६३ धावा केल्या. कॅमेरॉन ग्रीन ६ धावांवर माघारी गेला. तर स्टीव्ह स्मिथदेखील २६८ चेंडूत १२१ धावा केल्या. त्यानंतर अलेक्स कॅरी ४८ धावा करून माघारी गेला आणि मग मिचेल स्टार्क ५, नॅथन लायन ९ आणि पॅट कमिन्स ९ धावांवर बाद झाले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव ४६९ धावांवर आटोपला. सिराजने सर्वाधिक ४, शमी-शार्दुलने २-२ आणि जाडेजाने १ बळी टिपला.
ICC World Test Championship Final 2023, WTC Final, WTC final 2023 Ind vs AUS, IND vs AUS Live Match, IND Vs AUS Live Test match, IND vs AUS Test Match Live, IND vs AUS Scorecard, IND vs AUS Live updates
Web Title: ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 3 Shardul Thakur slams third consecutive Test fifty at Oval equals Bradman and Border
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.