ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scoreboard Day 4: कसोटी विश्वविजेतेपदाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसअखेर २९६ धावांची आघाडी घेतली ४ बाद १२३ धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या डावात त्यांनी ४६९ तर भारताने २९६ धावा केल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे मोठी आघाडी होती. तीच आघाडी आज चौथ्या दिवशी आणखी वाढवण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे फलंदाज मैदानात उतरतील. सामना ऑस्ट्रेलियाकडे झुकला असला तरी अद्याप भारताचा दुसरा डाव बाकी आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी सामना पूर्णपणे संपलेला नसून मॅच रंगतदार स्थितीत आहे. पण आजच्या दिवशी पाऊस या रंगाचा बेरंग करू शकतो असा अंदाज आहे.
लंडनमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर होणाऱ्या सामन्याच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी पावसाची शक्यता आहे. दोन्ही दिवशी दुपारी पावसासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. इंग्लंडच्या हवामान खात्याने सांगितले की, सकाळी ढग हळूहळू दूर होत आहेत, त्यानंतर भरपूर सूर्यप्रकाश आहे. वाढत्या प्रमाणात उष्ण आणि दमट, त्यामुळे दुपारपर्यंत पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. लंडनमध्ये सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत पावसाची 5 टक्के शक्यता आहे, परंतु दुपारी 3 वाजेपर्यंत पावसाची शक्यता 10 टक्के आहे. अशा स्थितीत पावसामुळे तिसऱ्या सत्राच्या खेळावर परिणाम होऊ शकतो. मात्र, या सामन्यासाठीही राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत पाऊस पडला तरी सामन्याचा निकाल लागण्याची शक्यता खूप जास्त आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने सध्या सामन्यावर पकड अधिक मजबूत केली आहे. पहिल्या डावात त्यांनी घेतलेल्या आघाडीनंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा स्वस्तात बाद झाले. स्टीव्ह स्मिथ आणि ट्रेव्हिस हेड यांनी सुरूवात मिळाली पण ते मोठी खेळी करू शकते नाहीत. हे दोघेही पहिल्या डावातील शतकवीर होते. ऑस्ट्रेलियाने चार विकेट शंभरच्या आत गमावल्या असल्या तरी मार्नस लाबूशेन पिचवर तळ ठोकून ४१ धावांवर नाबाद आहे.
त्याआधी, पहिल्या तीन दिवसात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४६९ धावांवर संपला. वॉर्नर, ख्वाजा, लाबूशेन, ग्रीन यांनी निराश केले. पण ट्रेव्हिस हेडने १६३ तर स्टीव्ह स्मिथने १२१ धावांची खेळी करत संघाला मोठी धावसंख्येच्या दिशेने नेले. या दोघांच्यानंतर अलेक्स कॅरीने ४८ धावा करत संघाला ४६९ पर्यंत मजल मारून दिली. प्रत्युत्तरात भारताच्या रोहित, गिल, विराट, पुजारा, भरत या पाच फलंदाजांनी निराशा केली. रविंद्र जाडेजाने ४८ धावांची झुंज दिली. त्यानंतर अजिंक्य रहाणेच्या ८९ आणि शार्दुल ठाकूरच्या ५१ धावांमुळे भारताने कशीबशी २९६ धावांपर्यंत मजल मारली.
ICC World Test Championship Final 2023, WTC Final, WTC final 2023 Ind vs AUS, IND vs AUS Live Match, IND Vs AUS Live Test match, IND vs AUS Test Match Live, IND vs AUS Scorecard, IND vs AUS Live updates