WTC Final: रविंद्र जाडेजाने कॅमेरॉन ग्रीनला भारी गंडवलं, नकळत उडवला त्रिफळा (Video)

Ravindra Jadeja Cameron Green, WTC Final 2023 IND vs AUS : कॅमेरॉन ग्रीनला चेंडू कळेपर्यंत जाडेजाने त्याचा 'कार्यक्रमच केला'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 05:14 PM2023-06-10T17:14:44+5:302023-06-10T17:15:14+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 4 Ravindra Jadeja clever bowling cameron green clean bowled foolish way watch video | WTC Final: रविंद्र जाडेजाने कॅमेरॉन ग्रीनला भारी गंडवलं, नकळत उडवला त्रिफळा (Video)

WTC Final: रविंद्र जाडेजाने कॅमेरॉन ग्रीनला भारी गंडवलं, नकळत उडवला त्रिफळा (Video)

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ravindra Jadeja Cameron Green, ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scoreboard Day 4: पहिल्या डावात भक्कम आघाडी घेतलेल्या ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी चांगलेच बांधून ठेवले. वरच्या फळीतील मार्नस लाबूशेनने ४१ धावांची झुंजार खेळी केली, पण चौथ्या दिवसाच्या पहिल्याच षटकात त्याला उमेश यादवने माघारी पाठवलं. त्यानंतर कॅमेरॉन ग्रीन चिवट खेळ करत होता पण त्याला जाडेजाने गंडवलं आणि त्रिफळाचीत करून तंबूत पाठवलं. त्यानंतर उपहारापर्यंत ऑस्ट्रेलियाने ६ बाद २०१ धावांपर्यंत मजल मारली आणि ३७४ धावांची आघाडी घेतली. पण जाडेजाने टिपलेली विकेट विशेष चर्चेत राहिली.

कॅमेरॉन ग्रीन आणि अलेक्स कॅरी ही जोडी संयमी खेळी करत होती. अलेक्स कॅरी शक्य त्या पद्धतीने धावा जमवत होता. पण ग्रीनला मात्र धावा काढता येत नव्हत्या. तशातच जाडेजाने प्लॅनिंग करून ओव्हर दी विकेट गोलंदाजी सुरू केली. चेंडूत पायाच्या मागे टप्पा पडून नजरेच्या रेषेबाहेरून आत येत होता. त्यामुळे ग्रीनला खेळताना त्रास झाला. त्यातच एक चेंडू अचानक स्पिन झाला. ग्रीनने चेंडू सोडला पण तो चेंडू त्याच्या हँडग्लोव्ह्जला लागला आणि स्टंपवर आदळला. त्यामुळे २५ धावांवर तो माघारी परतला.

लंचब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलिया अधिक मजबूत स्थितीत

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने सामन्यावर पकड अधिक मजबूत केली. पहिल्या डावात त्यांनी घेतलेल्या आघाडीनंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा स्वस्तात बाद झाले. स्टीव्ह स्मिथ आणि ट्रेव्हिस हेड यांनी सुरूवात मिळाली पण ते मोठी खेळी करू शकते नाहीत. हे दोघेही पहिल्या डावातील शतकवीर होते. ऑस्ट्रेलियाने चार विकेट शंभरच्या आत गमावल्या. त्यानंतर मार्नस लाबूशेनने ४१ धावांची झुंज दिली. पण तो बाद झाला. कॅमेरॉन ग्रीनही बाद झाला. आता अलेक्स कॅरी नाबाद ४१ धावांवर खेळत आहे.

ICC World Test Championship Final 2023, WTC Final, WTC final 2023 Ind vs AUS, IND vs AUS Live Match, IND Vs AUS Live Test match, IND vs AUS Test Match Live, IND vs AUS Scorecard, IND vs AUS Live updates

Web Title: ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 4 Ravindra Jadeja clever bowling cameron green clean bowled foolish way watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.