Rohit Sharma Sachin Tendulkar, ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scoreboard Day 4: भारतीय संघ सध्या लंडनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळत आहे. भारतीय संघाला मिळालेल्या ४४४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सुरूवात चांगली झाली. पण चहापानाच्या विश्रांतीआधी एक मोठा फटका भारताला बसला. शुबमन गिल चांगल्या लयीत दिसत होता. मात्र तो झेलबाद झाला. रोहित शर्मालाही चांगली सुरूवात मिळाली होती, पण त्याला अर्धशतकाने हुलकावणी दिली. या दरम्यान, भारतीय कर्णधार रोहित शर्माने एका बाबतीत महान सचिन तेंडुलकरला मागे टाकले.
रोहितने सचिनला केलं 'ओव्हरटेक'
सामन्याच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा एक पराक्रम मागे टाकला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा रोहित शर्मा आता तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या डावातील 7व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर रोहितने फाइन लेगच्या दिशेने षटकार ठोकला आणि सचिनला मागे टाकले. रोहितच्या नावावर आता टेस्टमध्ये एकूण 70 षटकार आहेत.
सेहवाग यादीत अव्वल
महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर या कसोटी क्रिकेटमध्ये 69 षटकार आहेत. या यादीत भारताचा माजी अनुभवी सलामीवीर वीरेंद्र सेहवागचे नाव अग्रस्थानी आहे. सेहवागने आपल्या कसोटी कारकिर्दीत 90 षटकार ठोकले. दुसऱ्या क्रमांकावर माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी 78 षटकारांसह आहे. तर या यादीत रोहित आता तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.
ICC World Test Championship Final 2023, WTC Final, WTC final 2023 Ind vs AUS, IND vs AUS Live Match, IND Vs AUS Live Test match, IND vs AUS Test Match Live, IND vs AUS Scorecard, IND vs AUS Live updates