WTC Final: सामन्यात घडला असा योगायोग, ज्याने भारताच्या विजयाची वाढली संधी

Team India Win Coincidence, WTC Final 2023 IND vs AUS : ऑस्ट्रेलियाची सामन्यावर पकड तरीही हा योगायोग भारतीयांना देईल दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 04:30 PM2023-06-10T16:30:48+5:302023-06-10T16:32:08+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 4 Shardul Thakur Luck happy coincidence 7th wicket partnership | WTC Final: सामन्यात घडला असा योगायोग, ज्याने भारताच्या विजयाची वाढली संधी

WTC Final: सामन्यात घडला असा योगायोग, ज्याने भारताच्या विजयाची वाढली संधी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Team India Win Coincidence, ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scoreboard Day 4: इंग्लंडमध्ये सध्या ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात फायनलचा सामना रंगला आहे. ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर २०२१ मध्ये जे घडले ते कोणीही विसरलेले नाही. टीम इंडियाच्या सर्वात ऐतिहासिक कामगिरीपैकी एक अशी ती कामगिरी होती. टीम इंडियाने त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा पराभव करून ३२ अबाधित असलेला गड भेदला. त्यानंतर भारताने ओव्हलच्या मैदानातही इंग्लंडला पराभूत केले. या दोन्ही सामन्यात घडलेली एक गोष्ट WTC फायनलमध्ये घडली आहे, त्यामुळे हा योगायोग भारतीयांना नक्कीच सुखावणारा आहे.

काय आहे योगायोग?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियासोबत एक योगायोग घडला. टीम इंडियाचे हे कनेक्शन शार्दुल ठाकूर आणि सातव्या विकेटच्या भागीदारीशी संबंधित आहे. ब्रिस्बेन गाबामध्ये शार्दुल ठाकूरने भारतासाठी पहिल्या डावात सातव्या विकेटसाठी वॉशिंग्टन सुंदरसोबत शतकी भागीदारी केली होती. टीम इंडियाने ती कसोटी ३ विकेटने जिंकली. शार्दुल ठाकूर आणि 7व्या विकेटसाठी शतकी भागीदारीचे हे गणित ओव्हलवरही फळले. शार्दुलने दुसऱ्या डावात रिषभ पंतच्या साथीने सातव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली होती आणि भारताने तो सामना १५७ धावांनी जिंकला होता.

WTC फायनलमध्येही असाच योगायोग

शार्दुलने सध्या सुरू असलेल्या सामन्यातही अजिंक्य रहाणेच्या साथीने सातव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. त्यामुळे गेल्या दोन वेळचे निकाल पाहता, हा योगायोग भारताला नक्कीच सुखावणारा आहे.

ICC World Test Championship Final 2023, WTC Final, WTC final 2023 Ind vs AUS, IND vs AUS Live Match, IND Vs AUS Live Test match, IND vs AUS Test Match Live, IND vs AUS Scorecard, IND vs AUS Live updates

Web Title: ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 4 Shardul Thakur Luck happy coincidence 7th wicket partnership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.