Shubman Gill Wicket Controversy, ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scoreboard Day 4: भारतीय संघाला मिळालेल्या ४४४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सुरूवात चांगली झाली. पण चहापानाच्या विश्रांतीआधी एक मोठा फटका भारताला बसला. शुबमन गिल चांगल्या लयीत दिसत होता. पण त्याच वेळी कॅमेरॉन ग्रीनने त्याचा स्लिपमध्ये कॅच घेतला आणि त्याला बाद केले. रिप्लेमध्ये चेंडू जमिनीला घासल्याचे दिसत असल्याचा दावा अनेकांनी केला, पण अखेर तिसऱ्या पंचांनी बाद दिल्यामुळे शुबमनला १८ धावांवर माघारी परतावे लागले. त्यामुळे चहापानापर्यंत भारताने १ बाद ४ धावा केल्या. त्यात रोहित शर्माच्या नाबाद २२ धावा आहेत.
शुबमन गिलचा वादग्रस्त झेल
रोहित शर्मा आणि शुबमन गिल या जोडीने दमदार सुरूवात केली. चांगले चेंडू बचावात्मक खेळत आणि सहज आलेल्या चेंडूंवर फटकेबाजी करत दोघेही चांगली आगेकूच करत होते. त्यामुळे ७ षटकांत भारताची धावसंख्या ४१ झाली होती. पण त्यानंतर एक घटना घडली आणि वाद निर्माण झाला. शुबमन गिलने स्कॉट बोलँडच्या गोलंदाजीवर चेंडू मारला. चेंडू स्लिपमध्ये गेला आणि कॅमेरॉन ग्रीनने त्याला बाद ठरवले. रिप्ले पाहताना चेंडू खाली घासला असल्याचा अनेकांना वाटले. पण तिसऱ्या पंचांनी मात्र गिलला बाज ठरवले. त्यामुळे रोहित शर्मा आणि शुबमन गिलदेखील भडकले. पण नाइलजाने गिलला माघारी जावे लागले. पाहा व्हिडीओ-
त्याआधी, ऑस्ट्रेलियाने सामन्यावर पकड अधिक मजबूत करत दुसरा डाव ८ बाद २७० धावांवर घोषित केला. पहिल्या डावात त्यांनी घेतलेल्या आघाडीनंतर दुसऱ्या डावात डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, स्टीव्ह स्मिथ, ट्रेव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन यांनी फारसा प्रभाव पाडला नाही. मार्नस लाबूशेनने ४१ धावांची झुंज दिली. मिचेल स्टार्कनेही दणकेबाज ४१ केल्या. तर अलेक्स कॅरीने डावातील सर्वाधिक नाबाद ६६ धावा केल्या. कर्णधार पॅट कमिन्स ५ धावांवर बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियाने डाव घोषित केला आणि भारताला ४४४ धावांचे आव्हान दिले.
ICC World Test Championship Final 2023, WTC Final, WTC final 2023 Ind vs AUS, IND vs AUS Live Match, IND Vs AUS Live Test match, IND vs AUS Test Match Live, IND vs AUS Scorecard, IND vs AUS Live updates