Virat Rahane Team India, ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scoreboard Day 4 stumps : ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ४४४ धावांच्या भल्यामोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने चौथ्या दिवसअखेर ३ बाद १६४ धावा केल्या. शुबमन गिल स्वस्तात माघारी परतला. रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांच्यात भागीदारी झाली. पण ते दोघे तंबूत परतल्यावर विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या दोन अनुभवी फलंदाजांनी दिवसाचा खेळ संपेपर्यंत खेळपट्टीवर तळ ठोकला. आता शेवटच्या दिवशी भारतीय संघाला विजयासाठी ९७ षटकांत २८० धावांची गरज आहे तर ऑस्ट्रेलियन संघाला ७ विकेट्सची आवश्यकता आहे.
भारतीय फलंदाजांची दमदार 'फाईट'
चौथ्या डावात शुबमन गिलची विकेट काहीशी वादग्रस्त ठरली. कॅमेरॉन ग्रीनचा कॅच जमिनीला टेकला असल्याचा अनेकांनी दावा केला, पण तिसऱ्या पंचांच्या निर्णयानंतर गिलला १८ धावांवर माघारी परतावे लागले. रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांच्यात ५१ धावांची भागीदारी झाली. रोहित शर्मा ६० चेंडूत ७ चौकार आणि एका षटकारासह ४३ धावांवर बाद झाला. तर पुजारा ४७ चेंडूत ५ चौकारांसह २७ धावांवर माघारी परतला. त्यानंतर विराट आणि अजिंक्य जोडीने डाव सांभाळला. या दोघांनी दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद ७१ धावांची भागीदारी केली. विराटच्या नाबाद ४४ आणि रहाणेच्या नाबाद २० धावांच्या जोरावर भारताने चौथ्या दिवसअखेर ३ बाद १६४ धावांपर्यंत मजल मारली.
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात काय घडलं?
ऑस्ट्रेलियाने सामन्यावर पकड अधिक मजबूत करत दुसरा डाव ८ बाद २७० धावांवर घोषित केला. पहिल्या डावात त्यांनी घेतलेल्या आघाडीनंतर दुसऱ्या डावात डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, स्टीव्ह स्मिथ, ट्रेव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन यांनी फारसा प्रभाव पाडला नाही. मार्नस लाबूशेनने ४१ धावांची झुंज दिली. मिचेल स्टार्कनेही दणकेबाज ४१ केल्या. तर अलेक्स कॅरीने डावातील सर्वाधिक नाबाद ६६ धावा केल्या. कर्णधार पॅट कमिन्स ५ धावांवर बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियाने डाव घोषित केला आणि भारताला ४४४ धावांचे आव्हान दिले.
पहिल्या दोन डावांत काय घडलं?
पहिल्या तीन दिवसांच्या खेळात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४६९ धावांवर संपला. वॉर्नर, ख्वाजा, लाबूशेन, ग्रीन यांनी निराश केले. पण ट्रेव्हिस हेडने १६३ तर स्टीव्ह स्मिथने १२१ धावांची खेळी करत संघाला मोठी धावसंख्येच्या दिशेने नेले. या दोघांच्यानंतर अलेक्स कॅरीने ४८ धावा करत संघाला ४६९ पर्यंत मजल मारून दिली. प्रत्युत्तरात भारताच्या रोहित, गिल, विराट, पुजारा, भरत या पाच फलंदाजांनी निराशा केली. रविंद्र जाडेजाने ४८ धावांची झुंज दिली. त्यानंतर अजिंक्य रहाणेच्या ८९ आणि शार्दुल ठाकूरच्या ५१ धावांमुळे भारताने कशीबशी २९६ धावांपर्यंत मजल मारली.
ICC World Test Championship Final 2023, WTC Final, WTC final 2023 Ind vs AUS, IND vs AUS Live Match, IND Vs AUS Live Test match, IND vs AUS Test Match Live, IND vs AUS Scorecard, IND vs AUS Live updates