Team India 444 Runs to win, ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scoreboard Day 4: बहुप्रतिक्षित टेस्ट वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताला शिल्लक राहिलेल्या दीड दिवसांच्या खेळात विजयासाठी ऑस्ट्रेलियाने तब्बल धावांचे ४४४ आव्हान दिले. ओव्हलच्या मैदानावर आतापर्यंच्या इतिहासात चौथ्या डावात सर्वाधिक २६३ धावांच्या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग करण्यात आलेला आहे. १९०२ साली हा विक्रम झाला होता. त्यामुळे आता भारताला हा सामना जिंकायचा असेल तर १२१ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडावा लागणार आहे.
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात काय घडलं?
ऑस्ट्रेलियाने सामन्यावर पकड अधिक मजबूत करत दुसरा डाव ८ बाद २७० धावांवर घोषित केला. पहिल्या डावात त्यांनी घेतलेल्या आघाडीनंतर दुसऱ्या डावात डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, स्टीव्ह स्मिथ, ट्रेव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन यांनी फारसा प्रभाव पाडला नाही. मार्नस लाबूशेनने ४१ धावांची झुंज दिली. मिचेल स्टार्कनेही दणकेबाज ४१ केल्या. तर अलेक्स कॅरीने डावातील सर्वाधिक नाबाद ६६ धावा केल्या. कर्णधार पॅट कमिन्स ५ धावांवर बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियाने डाव घोषित केला आणि भारताला ४४४ धावांचे आव्हान दिले.
पहिल्या दोन डावांत काय घडलं?
पहिल्या तीन दिवसांच्या खेळात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४६९ धावांवर संपला. वॉर्नर, ख्वाजा, लाबूशेन, ग्रीन यांनी निराश केले. पण ट्रेव्हिस हेडने १६३ तर स्टीव्ह स्मिथने १२१ धावांची खेळी करत संघाला मोठी धावसंख्येच्या दिशेने नेले. या दोघांच्यानंतर अलेक्स कॅरीने ४८ धावा करत संघाला ४६९ पर्यंत मजल मारून दिली. प्रत्युत्तरात भारताच्या रोहित, गिल, विराट, पुजारा, भरत या पाच फलंदाजांनी निराशा केली. रविंद्र जाडेजाने ४८ धावांची झुंज दिली. त्यानंतर अजिंक्य रहाणेच्या ८९ आणि शार्दुल ठाकूरच्या ५१ धावांमुळे भारताने कशीबशी २९६ धावांपर्यंत मजल मारली.
ICC World Test Championship Final 2023, WTC Final, WTC final 2023 Ind vs AUS, IND vs AUS Live Match, IND Vs AUS Live Test match, IND vs AUS Test Match Live, IND vs AUS Scorecard, IND vs AUS Live updates
Web Title: ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 4 Team India need runs to win need to break 121 years old record against Australia
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.