Join us  

WTC Final: विराट कोहलीने तोंडावर स्टीव्ह स्मिथची लाज काढली, म्हणाला- "एकदम फालतू..."

Virat Kohli Steve Smith, WTC Final 2023 IND vs AUS: स्टीव्ह स्मिथ पॅव्हेलियनमध्ये जात असताना घडला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 8:54 PM

Open in App

Virat Kohli Steve Smith, ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scoreboard Day 4: विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ हे दोघेही सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाज मानले जातात. यावेळी दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर उभे आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे संघ ओव्हल मैदानावर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळत आहेत. या सामन्याच्या पहिल्या डावात स्मिथने शतक झळकावले पण तो दुसऱ्या डावात बाद झाला. या सामन्यादरम्यान कोहलीने स्मिथच्या तोंडावर त्याची लाज काढली.

नक्की काय घडलं?

स्मिथने पहिल्या डावात 121 धावा केल्या. दुसऱ्या डावात मात्र त्याला केवळ 34 धावाच करता आल्या. दुस-या डावात स्मिथ ज्या प्रकारे बाद झाला, त्यावरून अनेकांना आश्चर्य वाटले कारण तो अतिशय खराब शॉटवर बाद झाला. यावेळी एक प्रकार घडला आणि त्याबद्दल चौथ्या दिवशीच्या खेळादरम्यान माहिती मिळाली. चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक जस्टिन लँगर आणि स्मिथ बोलत होते. तेव्हा स्मिथ म्हणाला की कोहलीने जवळ जाऊन त्याला 'एकदम फालतू फटका' (Rubbish Shot) असं सांगितले. चौथ्या दिवशी समालोचन करताना लँगरने हा किस्सा सांगितला. लँगरने सांगितले की, कोहलीच्या जागी दुसरे कोणी असते तर स्मिथने वेगळंच उत्तर दिलं असतं. पण समोर कोहली असल्याने स्मिथने त्याचं ऐकून घेतलं आणि कोहली जे बोलतोय ते बरोबर आहे हेही मान्य केलं.

जाडेजाच्या चेंडूवर स्मिथने पुढे जाण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता पण तरीही स्मिथने शॉट खेळला आणि चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन शार्दुल ठाकूरच्या हातात गेला. त्यामुळे स्मिथ स्वस्तात बाद झाला. पण तरीही ऑस्ट्रेलियाने अलेक्स कॅरीच्या नाबाद ६६ धावांच्या जोरावर भारताला ४४४ धावांचे आव्हान दिले.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीस्टीव्हन स्मिथआॅस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघ
Open in App