ICC WTC Final : ठिकाण अन् वेळ ठरली! क्रिकेटच्या पंढरीत रंगणार तिसऱ्या हंगामातील फायनल

भारतीय संघ पहिल्या दोन्ही हंगामातील फायनल खेळला, पण विजय काही गवसलाच नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 03:28 PM2024-09-03T15:28:06+5:302024-09-03T15:29:30+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Test Championship Final Dates confirmed Lord's Host The Third Edition Final From 11 June 2025 | ICC WTC Final : ठिकाण अन् वेळ ठरली! क्रिकेटच्या पंढरीत रंगणार तिसऱ्या हंगामातील फायनल

ICC WTC Final : ठिकाण अन् वेळ ठरली! क्रिकेटच्या पंढरीत रंगणार तिसऱ्या हंगामातील फायनल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC World Test Championship Final Dates confirmed At Lord's : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC)  आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या फायनलसंदर्भातील मोठी घोषणा केली आहे. चांदीच्या गदा आणि प्रतिष्ठित ट्रॉफीसाठीची फायनल लढत क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, ११  ते १५ जून, २०२५  या कालावधीत लॉर्ड्सच्या मैदानात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या हंगामातील फायनल खेळवण्यात येईल. या फायनलसाठी १६ जून हा राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे. 

पहिल्या दोन्ही हंगामात टीम इंडियाने गाठली फायनल, या मैदानात खेळवण्यात आल्या होत्या लढती

पहिल्यांदाच आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल ही क्रिकेटचं ऐतिहासिक मैदान असलेल्या लॉर्ड्सवर रंगणार आहे. या स्पर्धेतील पहिल्या दोन्ही हंगामातील फायनल लढती या  इंग्लंडमधील मैदानातच खेळवण्यात आल्या होत्या.  २०२१ मध्ये  भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील फायनल सामना साउथहँप्टनच्या मैदानात खेळवण्यात आला होता. न्यूझीलंडच्या संघाने भारताला शह देत पहिल्यांदा चांदीची गदा पटकावली होती. २०२३ च्या हंगामातही भारतीय संघाने फायनल गाठली. हा सामना  द ओव्हलच्या मैदानात रंगला होता. इथं ऑस्ट्रेलियन संघाने भारताला पराभूत करत अजिंक्यपद पटकावले होते.

पुन्हा भारतीय संघ प्रबळ दावेदार

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या हंगामातही भारतीय संघ प्रबळ दावेदार आहे.  या स्पर्धेतील फायनल खेळण्याच्या शर्यतीत टीम इंडिया आघाडीवर आहे. लॉर्ड्सच्या मैदानात पहिल्या दोन हंगामातील चुका टाळून आयसीसीच्या सर्व स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम करण्यासाठी टीम इंडिया प्रयत्नशील असेल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पुन्हा दिसतीये कडवी टक्कर

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारतीय संघ  ९ सामन्यातील ६ विजयासह ६८.५२ विनिंग पर्सेंटेजसह टॉपला आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने १२ सामन्यातील ८ विजयासह ६२.५० विनिंग पर्सेंटेजसह दुसऱ्या स्थानावर कब्जा केला आहे. या दोन संघांच्या पाठोपाठ न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज या संघांचा नंबर लागतो.

 

  

Web Title: ICC World Test Championship Final Dates confirmed Lord's Host The Third Edition Final From 11 June 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.