ICC World Test Championship Final Race Sri Lanka Test Squad vs South Africa : घरच्या मैदानातील दमदार कामगिरीच्या जोरावर श्रीलंकेचा संघध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीत भारत-ऑस्ट्रेलिया संघाला टक्कर देताना दिसतोय. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळण्याची दावेदारी भक्कम करण्यासाठी श्रीलंकेसमोर आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील कसोटी मालिकेचं मोठं आव्हान आहे. श्रीलंकेच्या संघानं या २ सामन्यांच्या महत्त्वपूर्ण मालिकेसाठी १७ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.
२ वर्षांनी कमबॅक करतोय हा खेळाडू, कसून रजितालाही मिळाली संधी
२७ नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर श्रीलंकेच्या संघाने उजव्या हाताचा फिरकीपटू लसिथ एम्बुलडेनिया यालाही संधी दिली आहे. हा खेळाडू दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीनंतर संघात परतला आहे. याआधी एम्बुलडेनिया २०२२ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या गाले कसोटीत दिसला होता. त्याच्याशिवाय कसून रजिता याचाही संघात समावेश आहे. जो न्यूझीलंंड विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकला होता.
श्रीलंकेनं खेळला खास डाव
पाकिस्तान विरुद्धच्या घरच्या मैदानातील मालिकेतील खराब कामगिरीनंतर लसिथ एम्बुलडेनिया याला डच्चू देण्यात आला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध श्रीलंकेला पुन्हा या गड्याची आठवण झाली आहे. त्यामागचं कारणही खास आहे. २०१९ मध्ये श्रीलंकेच्या संघानं दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कसोटी मालिका जिंकून दाखवली होती. या मालिकेत एम्बुलडेनिया याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
असा आहे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ
धनंजय डी सिल्वा (कर्णधार), निसांका, दिमुथ करुणारत्ने, ओशादा फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चंडीमल, सदीरा समरविक्रमा, कामिंदु मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, विश्वा, असिता फर्नांडो, लाहिरू कुमारा, कसून रजिता, प्रभात जयसूर्या, निशान पेरिस आणि लसिथ एम्बुलडेनिया, मिलन रथनायके.
दक्षिण आफ्रिकेचा संघ
टेम्बा बावुमा (कर्णधार), डेविड बेडिंगहॅम, गेराल्ड कोएत्झी, टोनी डी झोर्झी, मार्को यान्सेन, केशव महाराज, एडन मार्करम, विआन मुल्डर, सेनुरन मुथुसामी, डेन पॅटरसन, कागिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स, रायन रिकेल्टन आणि केनेरी.
दोन्ही संघांना WTC फायनलच्या दिशेनं आगेकूच करण्याची संधी
दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिका ही २०२३-२५ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप चक्रातील महत्वाची मालिका आहे. ही मालिका जिंकणारा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळण्याच्या शर्यतीत एक पाऊल पुढे टाकेल. या दोन्ही संघातील पहिला कसोटी सामना २७ नोव्हेंबरला डरबनच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. त्यानंत दुसरा सामना ५ डिसेंबरला गकेबेरहा/ पोर्थ एलिझाबेथ मैदानात नियोजित आहे.
Web Title: ICC World Test Championship Final Race Sri Lanka And South Africa Announced Squad For Two Match Test Series See Both Team Squad
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.