मुंबई, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : ट्वेंटी-20 मालिका बरोबरीत सुटल्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांनी आता कसोटी मालिकेकडे लक्ष केंद्रित केले आहे. ट्वेंटी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात विराट कोहलीच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने विजय मिळवला. पण, तिसऱ्या व अखेरच्या सामन्यात आफ्रिकेचा कर्णधार क्विंटन डी कॉकनं संमजस खेळी करताना भारताला पराभवाची चव चाखवली. आफ्रिकेनं ही मालिका 1-1 अशा बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले. आता दोन्ही संघांनी कसोटी मालिकेकडे मोर्चा वळवला आहे.
भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड यांनी जिंकले प्रत्येकी दोन सामने, तरीही टीम इंडिया टॉप!
कसोटीत आफ्रिकेचे पारडे जड आहे. त्यांनी 36पैकी 15 सामने जिंकले आहेत, तर केवळ 11 मध्ये हार पत्करावी लागली आहे. 10 सामने अनिर्णीत राहिले आहेत. पण, आता कसोटी मालिका आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेंतर्गत असल्यानं दोन्ही संघ संपूर्ण ताकदीनं मैदानात उतरतील हे निश्चित. भारतीय संघाने आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 120 गुणांसह अव्वल स्थानावर पकड मजबूत केली आहे. आफ्रिकेविरुद्ध यात भर घालून मोठी आघाडी घेण्याचा भारताचा निर्धार असेल. दुसरीकडे आफ्रिका जागतिक कसोटी स्पर्धेतील पहिलीच मालिका खेळणार आहे आणि त्यात दमदार कामगिरी करण्याचा त्यांचा निर्धार असेल.
कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिला सामनाः 2 ते 6 ऑक्टोबर - विशाखापट्टणम, वेळ - सकाळी 9.30 वाजल्यापासून
दुसरा सामनाः 10 ते 14 ऑक्टोबर - पुणे, वेळ - सकाळी 9.30 वाजल्यापासून
तिसरा सामनाः 19 ते 23 ऑक्टोबर - रांची, वेळ - सकाळी 9.30 वाजल्यापासून
भारताचा कसोटी संघ : विराट कोहली, मयांक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत, वृद्धीमान सहा, आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, शुबमन गिल.
दक्षिण आफ्रिकेचा कसोटी संघः फॅफ ड्यू प्लेसिस ( कर्णधार), टेंबा बवुमा, थेयूनिस डी ब्रुयन, क्विंटन डी कॉक, डीन एल्गर, झुबायर हम्झा, केशव महाराज, एडन मार्क्राम, सेनुरन मुथूसामी, लुंगी एनगिडी, अॅनरीच नोर्टजे, व्हेर्नोन फिलेंडर, डॅन पिएड्त, कागिसो रबाडा, रुडी सेकंड.
Web Title: ICC World Test Championship : Know All about India vs South Africa Test series; Date, Time and Venue
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.