ICC World Test Championship Points Table - भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दोन पर्वात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. २०२१मध्ये न्यूझीलंडकडून, तर २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाची हार झाली. पण, दोन्ही पर्वात फायनलमध्ये पोहोचवणारी टीम इंडिया WTC 25च्या तिसऱ्या पर्वातही दमदार कूच करताना दिसतेय. दुसरीकडे पाकिस्ताननेही WTC 25मधील त्यांच्या पहिल्याच कसोटीत क्लीनशीट राखून अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. त्यामुळे India vs Pakistan अशी ड्रिम फायनल २०२५ मध्ये पाहण्याची शक्यता नाकारता येणार नाही. क्रिकेटची पंढरी अर्थात लॉर्ड्सवर ही ऐतिहासिक फायनल होईल.
अॅशेस मालिकेनंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत फेरबदल पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती. ५ सामन्यांची ती मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. त्यात आज आयसीसीनं दोन्ही संघांवर कारवाई केली. षटकांची वेळ न पाळल्यामुळे त्यांचे गुण वजा करण्यात आले. इंग्लंडला १९ व ऑस्ट्रेलियाला १० गुणांची पेनल्टी बसली आहे. त्यामुळे आशियाई शेजारी भारत व पाकिस्तान यांची अव्वल दोन स्थानांवरील पकड अधिक मजबूत झाली आहे. हे दोन्ही संघ आतापर्यंत अपराजित राहिले आहेत.
भारतीय संघाचं पुढील कसोटी वेळापत्रक